शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

बाबासाहेबांची ‘ती’ ब्ल्यू प्रिंट बौद्धमय बनविणारी होती

By admin | Published: September 22, 2015 10:47 PM

राजरत्न आंबेडकर : वाघिवरे येथे जनजागरण प्रबोधन संमेलन

देवगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय करण्याचे जे स्वप्न ठेवले होते, ते साकार करण्यासाठीच दि बुद्धीष्ट सोसायटी आॅफ इंडिया तथा महासभेची स्थापना केली होती. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करताना या संस्थेची उद्देशिका, कार्यप्रणाली, नियमांची ब्ल्यू पिंं्रट तयार करून ठेवली होती. परंतु आमच्या लोकांना हे माहितच नाही. डॉ. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेसाठी बनविलेली ब्ल्यू पिंं्रट ही केवळ या संस्थेची नव्हती तर या देशाला बौद्धमय बनविणारी होती, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय महासचिव राजरत्न आंबेडकर यांनी देवगड तालुक्यातील वाघिवरे या ठिकाणी व्यक्त केले. देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ विजयदुर्ग विभागाच्यावतीने महापुरूष जीवनसंदेश अभियानाअंतर्गत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या शृंखलाबद्ध विशेष जनजागरण प्रबोधन संमेलनामध्ये उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विचारमंचावर संघाचे अध्यक्ष किशोर कांबळे, उपाध्यश दिलीप वाडेर, कार्याध्यक्ष तिर्लोटकर, डी. के. पेडणेकर, महिला अध्यक्ष सुरभी पुरळकर, उपाध्यक्षा अर्पिता साळुंखे, गाव शाखेचे अध्यक्ष मनोहर सावंत तसेच मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत आठवले, सुनील भालेराव, प्रदिप सावंत, रहाटे आदी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख दहा उद्देश निश्चित केले होते. यामध्ये भारताला बौद्धमय करण्याचाच मुख्य उद्देश दिसून येतो. राजरत्न म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी लिहून ठेवले की, भारतीय बौद्ध महासभेव्दारे देशात शाळा आणि महाविद्यालयांची निर्मिती करण्यात यावी. यामध्ये धर्माच्या आधारावर विज्ञानवादी शिक्षण दिले जावे. यामुळे प्रत्येक धर्माचा चिकीत्सक पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करून कोणता धर्म जनकल्याणाचा आहे हे ठरविण्याची बौध्दीक क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल. (प्रतिनिधी)+बौद्ध महासभेव्दारे पूर्ण क्षमतेने काम करणारते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेव्दारे देशात दवाखाने, अनाथालये, मदत केंद्रे स्थापन करण्यात यावीत असे सांगितले. डॉ. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दवाखाने, अनाथालये, मदत केंद्रे स्थापन झाली असती तर सरकारकडून आरोग्याच्या कोणत्याही सुविधा घेण्याची गरज उरली नसती. स्कोणत्याही योजनांसाठी याचना करण्याची गरज पडणार नव्हती. परंतु गेल्या ५९ वर्षात यावर काहीच काम झाालेले नाही. त्यामुळे आता भारतीय बौद्ध महासभेव्दारे बाबासाहेबांचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याचे ते म्हणाले.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम.बौध्दजन सेवा संघातर्फे महापुरूष जीवनसंदेश अभियानांतर्गत संमेलन.बाबासाहेबांनी भारतीय बौध्द महासभेचे दहा उद्देश केले होते निश्चित : राजरत्न आंबेडकर.