शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

नरडवे येथील नदीपात्रात मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 1:32 PM

Crimenews Kankavli Sindhudurg : कणकवली तालुक्यातील नरडवे घोलणवाडी परिसरातील नदीपात्रात एका तीस ते पस्तीस वर्षाच्या तरुणाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मात्र, अजूनही त्या मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देनरडवे येथील नदीपात्रात मृतदेह सापडलाओळख पटविण्यात अपयश ; कणकवली तालुक्यात खळबळ

कणकवली : तालुक्यातील नरडवे घोलणवाडी परिसरातील नदीपात्रात एका तीस ते पस्तीस वर्षाच्या तरुणाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मात्र, अजूनही त्या मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे.नरडवे घोलणवाडी येथील काही ग्रामस्थांना गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी कणकवली पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षक अजमुल्ला खान , उपनिरीक्षक अनमोल रावराणे, हवालदार वैभव कोळी तसेच पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी भेट दिली.

तसेच ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन त्याची ओळख पटविण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. तसेच नरडवे येथील कोणालाही त्या व्यक्तीबद्दल काहीही माहिती नव्हती.दरम्यान, २२ जुलै पासून सह्याद्री पट्ट्यात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी नदीपात्रात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुराच्या पाण्यात संबधित तरुण बुडाला असावा किंवा त्याने आत्महत्या केली असावी? तसेच त्याचा कोणी घातपात केला का ? या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत या घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. त्यामुळे अधिक माहिती समजू शकलेली नाही.यापूर्वीही नरडवे गावात जळालेल्या अवस्थेत एक व्यक्ती आढळून आली होती. त्या व्यक्तीबद्दलही पोलिसांना अजूनही काही माहिती समजलेली नाही. तसेच त्या व्यक्तीचीही ओळखही पटलेली नाही. त्यामुळे गुरुवारी मिळालेल्या या दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्गKankavli Police Stationकणकवली पोलिस स्टेशन