कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पावशी येथील धरणात आंघोळीसाठी गेलेल्या अभिषेक दळवी (२१) या युवकाचा बुडून मृत्यू झाल्यानंतर तब्बल २२ तासांनंतर मंगळवारी सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला.पावशी धरणात सोमवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास अभिषेक दळवी हा आंघोळ करण्यासाठी गेला होता. मात्र, तो पुन्हा घरी न आल्याने पावशी धरणपात्रात स्थानिक ग्रामस्थांनी शोधमोहीम राबविली. मात्र, तरीही तो आढळला नव्हता. मंगळवारी सकाळी पुन्हा मालवण येथील स्कुबा डायव्हिंग व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्याद्वारे तसेच ग्रामस्थांच्यावतीने धरण पात्रात शोध मोहीम सुरू होती.यावेळी पावशी सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे, कुडाळ पोलीस उपस्थित होते. अभिषेकच्या पश्चात आई आहे.पोलिसांनी बोट दिली नाही : कोरगांवकरधरणपात्रात अभिषेकचा शोध घेण्यासाठी पोलीस विभागाला त्यांच्या विभागातील बोट मिळावी अशी मागणी केली असता पोलीस प्रशासनाने बोट देण्यासाठी वरिष्ठांची परवानगी लागेल असे कारण दिले, अशी माहिती पावशी सरपंच बाळा कोरगावकर यांनी दिली.
धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 3:50 PM
कुडाळ तालुक्यातील पावशी येथील धरणात आंघोळीसाठी गेलेल्या अभिषेक दळवी (२१) या युवकाचा बुडून मृत्यू झाल्यानंतर तब्बल २२ तासांनंतर मंगळवारी सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला.
ठळक मुद्देधरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला पोलिसांनी बोट दिली नाही : कोरगांवकर