कणकवली : तालुक्यातील नरडवे भेर्देवाडी येथे जळालेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह बुधवारी रात्री आढळून आला आहे. हा मृत्यू संशयास्पद असून त्यादृष्टीने पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आणि श्वानपथक नरडवेत दाखल झाले आहे. तर बुधवारी रात्री घटनास्थळी जात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी प्राथमिक पाहणी केली होती.दरम्यान , गुरुवारी सकाळी पुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कटेकर, पोलीस निरीक्षक मुल्ला, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी घटनास्थळी जात सखोल चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटली नसून हा घातपात असावा या दृष्टीने पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आहेत.
नरडवे जळलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 14:20 IST
Kankavli Crimenews Police Sindhudurg : कणकवली तालुक्यातील नरडवे भेर्देवाडी येथे जळालेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह बुधवारी रात्री आढळून आला आहे. हा मृत्यू संशयास्पद असून त्यादृष्टीने पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे.
नरडवे जळलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला
ठळक मुद्देनरडवे जळलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळलाघातपात असल्याचा पोलिसांना संशय