सावंतवाडी : सातारा येथील बोलेरोचालक अक्षय हंगे आत्महत्या प्रकरणात त्याला भरपाईवरून बेदम मारहाण करणाऱ्या तेथील स्थानिक हॉटेल मालकावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात अखेरीस चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एकूण तीन आरोपी निष्पन्न झाले असून, हे तिन्ही आरोपी फरार असल्याची माहिती तपासी अधिकारी स्वाती यादव यांनी रविवारी दिली.दाणोलीजवळ कार व बोलेरो यांच्यात अपघात झाला होता. या अपघातात झालेल्या कारच्या नुकसान भरपाईवरून वादावादी होत चालक अक्षय याला बेदम मारहाणही करण्यात आली होती.यानंतर काही भरपाई रक्कम अक्षय याने देऊ केली. मात्र, तरीही कारचालकाचे समाधान झाले नाही. त्यानंतर विमा अधिकारी यांना बोलावून कारची झालेली भरपाई ठरवण्यात आली. त्यात आणखी भरपाई दिली जावी म्हणून अक्षयवर जबरदस्ती करण्यात आली. मात्र, पैसे नसल्यामुळे अक्षय हंगे हतबल झाला व त्याने बावळाट येथील जंगलात जाऊन आत्महत्या केली. याबाबत अक्षयचा साथीदार विशाल बुधावळे याने पोलीस ठाण्यात माहिती दिली.त्यावरून या प्रकरणी यापूर्वीच सावंतवाडी पोलीस ठाण्यात कोल्हापूर येथील कारचालक जितेंद्र पाटील आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपासी अधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जात ग्रामस्थांची चौकशीदेखील केली. या चौकशीमध्ये तेथील एका स्थानिक हॉटेल मालकाने अक्षय याला मारहाण केली होती, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
बोलेरो चालकाची आत्महत्या मारहाणीनंतरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 5:33 PM
Crimenews sindhudurg-सातारा येथील बोलेरोचालक अक्षय हंगे आत्महत्या प्रकरणात त्याला भरपाईवरून बेदम मारहाण करणाऱ्या तेथील स्थानिक हॉटेल मालकावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात अखेरीस चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एकूण तीन आरोपी निष्पन्न झाले असून, हे तिन्ही आरोपी फरार असल्याची माहिती तपासी अधिकारी स्वाती यादव यांनी रविवारी दिली.
ठळक मुद्देबोलेरो चालकाची आत्महत्या मारहाणीनंतरच स्थानिक हॉटेल मालकाकडून मारहाण : आतापर्यंत तिघांवर गुन्हे