शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

लाच घेताना दोघांना अटक

By admin | Published: December 04, 2014 12:55 AM

दुसरा दणका : उत्पादन शुल्कचा दुय्यम निरीक्षकाचा समावेश

सावंतवाडी : ट्रान्स्पोर्टच्या गाड्या सोडण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना सिंधुदुर्ग जिल्हा भरारी पथकाचा उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक सत्यवान अर्जुन भगत (वय ३०) याच्यासह इन्सुली येथील बाळकृष्ण परशुराम कुडव (वय २७) या दोघांना ठाणे येथील लाचलुचपत विभागाचे परिक्षेत्र अधीक्षक दत्ता कराळे यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. काल, मंगळवारीच सावंतवाडीत लाच घेताना भूमापकास अटक झाली होती. ही कारवाई आज, बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ट्रान्स्पोर्टचे मालक गजाली खान (रा. बडोदा, गुजरात) यांच्या तक्रारीनुसार झाराप-पत्रादेवी महामार्गावरील इन्सुली-डोंबवाडी येथे करण्यात आली. गुजरात येथील गजाली खान यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. आज ते गोव्याहून गुजरात येथे येत होते. यावेळी त्यांच्या गाड्या सोडण्याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा भरारी पथकाचा प्रमुख उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती. गजाली खान यांनी लाचलुचपत विभाग ठाणे पालघर यांना माहिती दिली. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून गजाली यांच्याकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना बाळकृष्ण कुडवला पकडले. ही रक्कम भगत याच्यावतीने बाळकृष्ण कुडव याने स्वीकारली होती. त्यामुळे भगत याला ओरोस येथून ‘तुमचे काम झाले आहे, तुम्ही या’, असे सांगून इन्सुली येथे बोलाविले आणि त्यालाही ताब्यात घेतले. (वार्ताहर)