शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

देवगड येथे लाच घेताना दोघांना अटक

By admin | Published: May 22, 2017 11:38 PM

देवगड येथे लाच घेताना दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगड : येथील पंचायत समिती कार्यालयातील लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता संतोष गणपत भाबल (वय ५१) व खासगी मदतनीस अविनाश लक्ष्मण उपरकर (४८) यांना १५ हजार रुपयांची लाच घेताना देवगड लाचलुचपत विभागाचा पथकाने त्यांच्या कार्यालयात सोमवारी दुपारी रंगेहात पकडले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मुणगे कारीवणेवाडी येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या प्रस्तावास मंजुरी देणे व कार्यारंभ आदेश काढणे यासाठी ही लाच घेण्यात येत होती.देवगड तालुक्यातील मुणगे कारीवणेवाडी येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रस्ताव मुणगे ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समिती देवगडकडे पाठविला होता. या प्रस्तावास मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश देण्यासाठी भाबल यांनी वरिष्ठ अधिकारी यांना दहा हजार रुपये व पंचायत समितीमधील वरिष्ठ सहायक लिपिक व अन्य कर्मचारी यांना पाच हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी शाखाअभियंता भाबल यांनी संबंधित सामाजिक कार्यकर्ते व तक्रारदार प्रसाद जोशी यांच्याकडे १५ मे रोजी केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत आवश्यक ती कार्यवाही करून याप्रकरणी सोमवारी (दि. २२) पंचायत समिती लघुपाटबंधारे विभाग या कार्यालयात रीतसर सापळा रचून पंधरा हजार रुपयांची लाच घेताना शाखा अभियंता भाबल व त्यांचे खासगी सहायक अविनाश उपरकर यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा लाचलुचपत विभाग पोलीस उपअधीक्षक शंकर चिंदरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक भार्गव फाले, पोलीस नाईक नीलेश परब, महिला पोलीस नाईक कांचन प्रभू, पोलीस शिपाई महेश जळवी, जितेंद्र पेडणेकर या पथकाने केली. लाचलुचपत विभागामार्फत महिन्याभरातील ही तिसरी कारवाई असून, देवगड पंचायत समितीमध्ये ही दुसरी कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे.गुन्हा दाखल करीत ताब्यात घेतलेशाखा अभियंता भाबल यांनी मुणगे कारीवणेवाडी येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या मंजुरीसाठी व कार्यारंभ आदेश घेण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. ही लाच त्यांची खासगी व्यक्ती उपरकर यांनी शाखा अभियंता यांच्या कार्यालयातच भाबल यांच्यावतीने त्यांच्याच समोर स्वीकारली होती. या घटनेसंदर्भात अधिक चौकशीकरिता पंचायत समिती देवगड कार्यालयातील वरिष्ठ सहायक स्वप्नजा संतोष बिर्जे यांना ताब्यात घेतले असून, लाच घेतल्याप्रकरणी भाबल व उपरकर यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.