शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

लाचप्रकरणी वीज अभियंता ताब्यात, लाचलुचपतची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 11:22 AM

ट्रान्सफार्मरमधून वीजपुरवठा सुरू करून देण्यासाठी तब्बल ४३ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कुडाळ येथील वीज वितरण कंपनीतील सहाय्यक अभियंता हरी महादेव कांबळे (४२, रा. कुडाळ) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

ठळक मुद्देलाचप्रकरणी वीज अभियंता ताब्यात, लाचलुचपतची कारवाई वीज कनेक्शन देण्यासाठी मागितले पैसे

कुडाळ : ट्रान्सफार्मरमधून वीजपुरवठा सुरू करून देण्यासाठी तब्बल ४३ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कुडाळ येथील वीज वितरण कंपनीतील सहाय्यक अभियंता हरी महादेव कांबळे (४२, रा. कुडाळ) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.कुडाळ एमआयडीसीतील एका उद्योजकाने त्याच्या कंपनीत वीजपुरवठा होण्यासाठी ट्रान्सफार्मर बसविला आहे. या ट्रान्सफार्मरला डीपी कनेक्शन मिळण्यासाठी कुडाळ येथील वीज वितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता हरी कांबळे यांच्याकडे अर्ज दिला होता. मात्र, डीपी कनेक्शन देऊन वीजपुरवठा सुरू करून देण्यासाठी कांबळे याने त्या उद्योजकाकडे सुमारे ४३ हजार रुपयांची मागणी केली होती.याबाबत संबंधित उद्योजकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कुडाळ येथे सापळा रचत तक्रारदार उद्योजकाकडून ४३ हजार रुपयांची लाच घेताना कांबळे याला रंगेहाथ पकडले.दोन दिवसांची मिळाली पोलीस कोठडीलाच घेतल्याप्रकरणी अटक केलेल्या हरी कांबळे याला रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.ही कारवाई पोलीस निरीक्षक मितेश केणी, जनार्दन जवडकर, सुभाष गवस, निलेश परब यांनी केली. या कारवाईमुळे वीज वितरण विभागात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग