सावंतवाडी : इन्सुली पागावाडी येथील पूल सुमारे पन्नास वर्षांपूर्वी कमी उंचीचे बांधलेले आहे. ते सध्या धोकादायक बनले आहे. या धोकादायक पुलावरून शेतकऱ्यांचे पावसाळ्यात मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यामध्ये पुलावर वारंवार पाणी येत असल्याने गुरे वाहून जात आहेत. बांदा-सावंतवाडी मार्गही बंद पडत आहे. याबाबत उपसरपंच कृष्णा सावंत यांनी बांधकाम उपअभियंता अनिल आवटी व कनिष्ठ अभियंता शितल सर्पे यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.यावेळी सचिन सावंत, दत्ताराम सावंत, प्रभाकर पेडणेकर, प्रदीप सावंत, हेमंत राणे, राजाराम कोठावळे,अविनाश सावंत, आप्पा कोठावळे, नंदू नाईक, सखाराम पेडणेकर आदी उपस्थित होते इन्सुली गावचे माजी उपसरपंच कृष्णा सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले. तसेच पालकमंत्र्यांना निवेदन देणार आहेत असेही त्यांनी सांगितले.या निवेदनात त्यांनी म्हटले की, या पुलावर खड्डे पडून ते ठिसूळ झालेले आहे. आतापर्यंत सुमारे १७ ते १८ लोकांना या पुलामुळे दुखापती झाल्या आहेत. पूल कमी उंचीचे असल्याने पावसाळ्यामध्ये गुरे तसेच शाळकरी मुली वाहून गेल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांची पाळीव जनावरेदेखील वाहून गेल्यामुळे सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष दिले नाही तर मार्च २०२१ मध्ये शिवसैनिकांना घेऊन आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही सावंत यांनी दिला आहे.शेतकऱ्यांना दिलासा द्यावादरवर्षी हा पूल धोकादायक बनत असून पावसाळ्यामध्ये बांदा- सावंतवाडी मार्गावरील पर्यायी वाहतूक पुराच्या पाण्यामुळे बंद असते. त्यामुळे बांधकाम खात्याने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. इन्सुली पागावाडी येथील पूल नवीन बांधून त्याची उंची वाढवावी आणि लोकांना व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कृष्णा सावंत यांनी केली आहे.
इन्सुली पागावाडी येथील पूल धोकादायक स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 1:38 PM
pwd, sindhdudurg, bridge इन्सुली पागावाडी येथील पूल सुमारे पन्नास वर्षांपूर्वी कमी उंचीचे बांधलेले आहे. ते सध्या धोकादायक बनले आहे. या धोकादायक पुलावरून शेतकऱ्यांचे पावसाळ्यात मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यामध्ये पुलावर वारंवार पाणी येत असल्याने गुरे वाहून जात आहेत. बांदा-सावंतवाडी मार्गही बंद पडत आहे. याबाबत उपसरपंच कृष्णा सावंत यांनी बांधकाम उपअभियंता अनिल आवटी व कनिष्ठ अभियंता शितल सर्पे यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.
ठळक मुद्देग्रामस्थांनी वेधले बांधकाम उपअभियंत्यांचे लक्ष उपोषणास बसण्याचा दिला इशारा