कणकवली : मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणा अंतर्गत कणकवली ते वागदे जोडणारा ब्रिटीशकालीन गडनदी पूल पाडण्यात आला. त्यामुळे या पुलाशी जोडले गेलेले अनेक प्रसंग आता कणकवलीवासीयांच्या फक्त आठवणीतच उरणार आहेत.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. या कामा अंतर्गत महामार्गावरील जुने पूल तोडून त्याठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत आहेत. कणकवली तसेच वागदे गाव जोडणारा गडनदी पूल तसा वाहतुकीसाठी महत्वपूर्ण असाच आहे.
या पुला जवळ नवीन पूल उभारण्यात आला आहे. या पुलावरून आता वाहतूक सुरू करण्यात आली आहे . तर जुना पूल तोडून त्याठिकाणीही नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी गडनदी वरील ब्रिटिश कालीन पूल तोडण्यात आले.हे पूल तोडण्याचे काम सुरू करण्यात आल्याने त्या पुलाविषयीच्या कणकवली वासीयांच्या अनेक आठवणी होळी पौर्णिमेच्या दिवशी जाग्या झाल्या. त्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.