बांदा : नेतर्डे-खैराटवाडी येथे वीज वाहिनेचा स्पर्श झाल्याने म्हैशीचा जागीच मृत झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. ऐन शेतीच्या हंगामात नुकसान झाल्याने येथील शेतकरी अनिल गोपाळ गवस यांच्या समोर मोठे संकट उभे राहिले आहे. म्हशीचा मृत्यू झाल्याने गवस यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.नेतर्डे येथील शेतकरी गवस यांनी मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेताच्या बाजूला सर्व गुरांना चरण्यासाठी सोडले होते. तुटलेली वीज वाहिनी पडलेली निदर्शनास आल्याने ते पुढे गेले नाहीत. मात्र, या तारेला स्पर्श झाल्याने त्यांच्या म्हशीचा जागीच मृत्यू झाला.म्हशीचा मृत्यू झाला त्याच्या काही अंतरावर गवस हे काम करत होते. पण ते पुढे न जाता तेथेच थांबल्याने मोठा अनर्थ टळला. या बाबतची माहिती गवस यांनी स्थानिक ग्रामस्थांना दिली. या घटनेनंतर तात्काळ वीजपुरवठा खंडित केल्याने मोठी दुर्घटना टळली.
वीज वाहिनीचा स्पर्श होऊन म्हैस जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 12:41 PM
बांदा : नेतर्डे-खैराटवाडी येथे वीज वाहिनेचा स्पर्श झाल्याने म्हैशीचा जागीच मृत झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. ऐन शेतीच्या ...
ठळक मुद्देवीज वाहिनीचा स्पर्श होऊन म्हैस जागीच ठारसुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान