वैभववाडी : महाडच्या दुर्घटनाग्रस्त पुलाप्रमाणेच सिंधुदुर्गातही ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाले आहेत. या पुलांवरही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे जीर्ण झालेल्या पुलांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांबाबत जिल्हा काँग्रेस रणनीती ठरविणार असून, धोकादायक पुलांना आम्ही अधिकाऱ्यांना बांधून ठेवू. अधिकारी वाहून गेले की त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून पाच ते दहा लाखांच्या मदतीची घोषणा करू, असे खळबळजनक विधान आमदार नीतेश राणे यांनी शनिवारी कोकिसरे येथे माध्यमांशी बोलताना केले.महाडच्या सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेतील मृत भूमी पाटेकर यांच्या कुटुंबीयांचे आमदार नीतेश राणे यांनी कोकिसरे येथे जाऊन सांत्वन केले. तेथून निघताना आमदार राणे यांनी महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी तहसीलदार संतोष जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, बांधकाम सभापती दिलीप रावराणे, सभापती शुभांगी पवार, जिल्हा परिषद सदस्य स्नेहलता चोरगे. पंचायत समिती सदस्य नासीर काझी, आदी उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले की, दुर्घटनेनंतर सांत्वन करून मदत देऊन उपयोग नाही. त्याऐवजी घटना टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते.
धोकादायक पुलांना अधिकाऱ्यांना बांधणार
By admin | Published: August 07, 2016 1:13 AM