शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Sindhudurg: पारपोलीतील फुलपाखरांचे विश्व उलगडणार, उद्यापासून महोत्सव सुरु

By अनंत खं.जाधव | Published: October 19, 2023 6:10 PM

गावात सुमारे 180 जातीची फुलपाखरे

सावंतवाडी : फुलपाखरू महोत्सवाच्या निमित्ताने पालपोली गावातील फुलपाखरांचे विश्व उलगडणार असून फुलपाखरे बघण्यासाठी हजारो पर्यटक पारपोली गावात येणार आहेत या गावात सुमारे 180 जातीची फुलपाखरे असून या निमित्ताने या फुलपाखरांच्या प्रजातीची ओळख पर्यटकांना होणार आहे.उद्या शुक्रवारपासून सोमवार (दि.२३) पर्यंत चार दिवस हा फुलपाखरू महोत्सव चालणार असून त्याचे उद्घाटन पालकमंत्री रविंद्र चव्हाण याच्या हस्ते, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, उपवनसंरक्षक एस.एन रेड्डी यांच्या उपस्थितीत होणार आहे.सह्याद्रीच्या पट्ट्यातील आंबोलीपासून त्याच्या पायथ्यापर्यंतची गावे ही नैसर्गिक साधनसंपत्तीचे नटली असून या गावातील पर्यटनाचे विश्व ही सर्वासमोर आल्यास अनेक पर्यटक या गावामध्ये येणार आहे. वनविभागाच्या पुढाकारातून प्रथमच पारपोली गावात फुलपाखरू महोत्सव भरविण्यात आला आहे. पारपोली परिसरात सुमारे फुलपाखरांच्या १८० प्रजाती आहेत. फुलपाखरांचे गाव म्हणून पारपोली ओळख निर्माण होणार आहे त्यामुळे परिसरात पर्यटन आधारित रोजगार येऊ शकतो गावात पर्यटकांची संख्या वाढणार आहे.या निमित्ताने फुलपाखरू तज्ञ हेमंत ओगले हे म्हणाले, सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये हंगामी फुलपाखरू आढळून येतात. थंडीच्या कालावधीत फुलपाखरू विशेषतः आढळत नाहीत. मात्र पारपोलीमध्ये १८० फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. आंबोलीमध्ये देखील फुलपाखरू उद्यान आहे. आंबोलीतील वाहणारे धबधबे आणि नैसर्गिक दृष्ट्या जंगल पारपोलीमध्ये असल्याने फुलपाखरांसाठी त्या ठिकाणी पोषक वातावरण आहे. महोत्सवातून रोजगारावर भरफुलपाखरू महोत्सवातून रोजगारावर भर देण्यात आला असून पारपोली गावातील काही घरे ही पर्यटक राहाण्यासाठी घेण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात 35 पर्यटक तर दुसऱ्या टप्यात 35 असे सत्तर पर्यटक गावात महोत्सवाच्या निमित्ताने वास्तव्य करणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग