शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
2
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
3
मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
4
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
5
अजितदादा काँग्रेसला धक्का देणार?; ४ आमदार लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
6
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
7
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
8
एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
9
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
10
Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
11
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
12
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
13
"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट
14
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
15
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  
16
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
17
Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
18
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
19
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
20
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी

सी-वर्ल्डला ग्रामस्थांचा विरोध कायम

By admin | Published: July 04, 2016 11:35 PM

वायंगणीतील ग्रामसभेत वादळी चर्चा : शुभारंभाचा नारळ फोडणारे ‘लक्ष्य’

आचरा : मालवण तालुक्यातील वायंगणी-तोंडवळी येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत वायंगणी ग्रामपंचायतीच्यावतीने बोलावण्यात आलेल्या विशेष सभेत वादळी चर्चा रंगली. आता प्रकल्पाला विरोध दर्शविणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी यापूर्वी सी-वर्ल्ड मोजणीच्या शुभारंभाचा नारळ फोडलाच कसा? असा सवाल करत विरोध दर्शविणाऱ्या लोकप्रतिनिधींवरच निशाणा साधला. तर काही ग्रामस्थांनी प्रकल्पाची सकारात्मक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी उपस्थित ग्रामस्थ आक्रमक बनले. प्रकल्पाला आपला विरोध होता आणि यापुढेही राहील, असे सांगत उपस्थित शंभर ते दीडशे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा सी-वर्ल्ड विरोधाचा ठराव घेतला.सी-वर्ल्ड प्रकल्पाचा आराखडा ४०० एकरचा केल्यानंतर संस्थेने नव्या आराखड्यानुसार गावातील हद्द निश्चितीसाठी चिन्हांकन प्रक्रिया हाती घेतली होती. या प्रक्रियेस विरोध दर्शविताना वायंगणी गावाच्यावतीने सोमवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन सरपंच प्रज्ञा धुळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य उदय दुखंडे, उपसरपंच हनुमंत प्रभू, सदस्य मालती जोशी, राजन आचरेकर, अमित खोत, प्रफुल्ल माळकर यांच्यासह वायंगणी ग्रामस्थ उपस्थित होते.१३९० एकर क्षेत्रात सी-वर्ल्ड निश्चित झाला, त्यापूर्वी या प्रकल्पाच्या मोजणी कामाचा शुभारंभ स्थानिक पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सरपंचांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी या प्रकल्पाला विरोध करून शुभारंभाचा नारळ फुटला नसता तर आता विरोध-विरोध करून ग्रामसभा घेण्याची वेळ वायंगणी ग्रामस्थांवर आली नसती असे काही ग्रामस्थांनी सांगितले. तर ग्रामस्थ अमित खोत यांनी प्रकल्पाला विरोध असेल तर त्याची कारणे दिली जावीत. कोणाच्या सर्व्हे नंबरमध्ये प्रकल्प निश्चित झाला आहे. याची माहिती नसताना विरोध का? प्रकल्पात कोणाची घरे, जमिनी जाऊ नयेत, अशी आपली भूमिका आहे. स्थानिकांना उद्ध्वस्त करून होणारा प्रकल्प नकोच. मात्र विरोध करायचा असेल तर तो दिशाभूल करणारा असू नये, असे स्पष्ट केले. मात्र यावेळी काही ग्रामस्थांनी आपला या प्रकल्पाला विरोध आहे असे सांगत खोत यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी वादावर नियंत्रण मिळवताना खोत यांना व्यासपीठाजवळ आणले. सकाळी १० वाजता सुरू होणारी सभा १०० सभासद ग्रामस्थांचा कोरम ११ वाजेपर्यंत न भरल्याने सुरू झाली नव्हती. अखेर ११ वाजल्यानंतर ही विशेष ग्रामसभा सुरू झाली. (वार्ताहर)उदय दुखंडे : धनदांडग्यांच्या जागा वळविल्यापूर्वी हा प्रकल्प होत असताना जो १३९० एकरचा आराखडा होता. त्यात बदल करून मुख्यमंत्र्यांनी ४०० एकरवर आणला. याचा आराखडाही तयार झाला. मात्र, या आराखड्यात धनदांडग्यांनी खरेदी केलेली जमीन वगळण्यात आली आहे, असा आरोप काही ग्रामस्थांनी केला. तर केवळ स्थानिक शेतकरी व कसणाऱ्यांच्या जमिनी घेण्याचा डाव शासनाचा आहे. याबाबत मुंबईतील आमची समिती माहितीच्या अधिकारात माहिती मिळवत असल्याचेही उदय दुखंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. दीडशे ग्रामस्थांची उपस्थितीसभा संपेपर्यंत गावातील १६०० हून अधिक मतदारांपैकी दीडशे ग्रामस्थही उपस्थित नव्हते. अखेर वायंगणी गावाचा या प्रकल्पाला विरोध आहे, असा एकमुखी ठराव घेण्यात आला. यावेळी ग्रामसेवकांनी प्रकल्पाबाबत ग्रामस्थांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे मत मांडले. हा ठराव शासन स्तरावर पाठविण्यात यावा, असे ठरविण्यात आले.