शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

सी-वर्ल्डसाठी एक इंचही जागा देणार नाही

By admin | Published: February 03, 2015 11:33 PM

ग्रामस्थांचा इशारा : शासनाच्या धोरणांवर विश्वास नाही

आचरा : मुख्यमंत्र्यांनी कमी जागेत सी-वर्ल्ड प्रकल्प साकारू, असे जाहीर केले तरी शासनाच्या धोरणांवर आमचा विश्वास नाही. यापूर्वी अनेक प्रकल्पग्रस्तांना शासनाने वाऱ्यावर सोडले. सी-वर्ल्ड कमी जागेत करू असे सांगत गाव घशात घालायलाही हे शासन मागे-पुढे पाहणार नाही. त्यामुळे सी-वर्ल्ड प्रकल्पविरोधी लढा यापुढे असाच सुरू राहणार असून प्रकल्पासाठी एक इंचही जागा देणार नाही. शासनाला हा प्रकल्प गुंडाळण्यासाठी गुडघे टेकावेच लागतील, अशी भूमिका वायंगणी- तोंडवळी ग्रामस्थांनी घेत मुख्यमंत्र्यांसह शासनाला एकप्रकारे इशाराच दिला आहे.वायंगणी- तोंडवळी गावात प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्प पूर्वीच्या शासनाने जाहीर केलेल्या १३९० एकरमध्ये नव्हे, तर केवळ ४० टक्के जमिनीतच साकारू, असे जाहीर वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालवणातील पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले होते. या पार्श्वभूमीवर प्रकल्पास विरोध दर्शविणाऱ्या वायंगणी- तोंडवळी गावातील ग्रामस्थांची बैठक मंगळवारी वायंगणी गांगो मंदिरात झाली. यावेळी उदय दुखंडे, कामिनी सावंत, अरुण कांबळी, राजू वराडकर, वैशाली सावंत, मच्छिमार समाजाचे दिलीप घारे व ग्रामस्थ उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांची भूमिका ही आम्हा ग्रामस्थांची फसवणूक करण्यासाठी आहे. ४०० एकर सांगून शासन कधी १३०० एकरपर्यंत जाईल ते सांगता येणार नाही. येथील जमिनी घशात घालण्याचा शासनाचा डाव आहे. मागील आणि सध्याचे शासन या कोणावरच आमचा विश्वास नाही. माजी पालकमंत्र्यांनी १३९० एकर जागा प्रकल्पास लागणार, असे सांगितले. आताचे सरकार प्रकल्प होण्यासाठी ४०० एकरमध्ये होईल, अशी भूमिका मांडते. पूर्वीचे पालकमंत्री जादा जागा कोणाच्या फायद्यासाठी घेत होते? प्रकल्प विरोधाबाबत आमचा लढा सुरूच राहणार असून मुंबईतील ग्रामस्थांची लवकरच बैठक होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.भाजपचे तालुकाध्यक्ष व सहकाऱ्यांनी प्रकल्प होण्यासाठी ग्रामस्थांच्या भूमिका जाणून घेऊ, असे जाहीर केले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर प्रकल्पास विरोध करणारे आता काय करणार? असा सूर निघत आहे. त्यामुळे यापुढेही आपला विरोध आहे हे दर्शविण्यासाठी ही बैठक घेतल्याचे सांगण्यात आले. महिला ग्रामस्थांतून, माळरानावरील शेकडो एकराची जमीनधारकांची फसवणूक करून खरेदी-विक्री झाल्याचे सांगत ही जमीन परत मिळवता येईल का? याबाबतची चर्चा झाली.