बांदा : रोणापाल-पाडलोस भाकरवाडी दरम्यान सुरू असलेल्या तिलारी कालव्याचा भराव खचून वाहतूक मार्गावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बांदा, मडुरा येथे ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. हा मातीचा जोडरस्ता वाहतुकीस बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.सावंतवाडी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. या पावसात रोणापाल येथील तिलारी कालव्याचा व जोडरस्त्याचा भराव खचून मार्गावर चिखल झाला आहे. रोणापाल-आंब्याचे गाळू, पाडलोस भाकरवाडी, सातीवनमळी येथील ग्रामस्थांना येथून ये-जा करावी लागते. तिलारी कालवा अधिकाऱ्यांचे याकडे झालेले दुर्लक्ष पाहून ग्रामस्थांनी शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांचे लक्ष वेधले.राजू शेटकर यांनी सहकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी युवासेना मळेवाड विभागाचे पदाधिकारी समीर नाईक, युवासेना पाडलोस शाखाधिकारी रोहित गावडे, रोणापाल माजी शाखाप्रमुख एकनाथ भोगटे व ग्रामस्थ उपस्थित होते.दोन दिवसांत मार्ग निर्धोक करण्याची ग्वाही : शेटकरवाहनचालक व ग्रामस्थांची होणारी गैरसोय व धोका लक्षात घेऊन शेटकर यांनी तिलारी कालव्याचे शाखा अभियंता मुद्गल यांच्याशी संपर्क साधून तत्काळ त्याठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यास सांगितले. त्यांच्या मागणीस अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन दिवसांत चिखलमय मार्ग निर्धोक करण्याची ग्वाही दिली, असे उपतालुकाप्रमुख शेटकर यांनी सांगितले.
कालव्याचा भराव खचला, रोणापाल येथील मातीचा जोडरस्ता वाहतुकीस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 10:59 AM
रोणापाल-पाडलोस भाकरवाडी दरम्यान सुरू असलेल्या तिलारी कालव्याचा भराव खचून वाहतूक मार्गावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बांदा, मडुरा येथे ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. हा मातीचा जोडरस्ता वाहतुकीस बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.
ठळक मुद्देकालव्याचा भराव खचला, रोणापाल येथील घटना मातीचा जोडरस्ता वाहतुकीस बंद