शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

गणेशोत्सवातील परीक्षा रद्द करा

By admin | Published: September 17, 2015 11:28 PM

राजू मसूरकर : आंदोलन करण्याचा इशारा

सावंतवाडी : गणेशोत्सव म्हणजे हिंदू धर्मियांचा जिव्हाळ्याचा सण. महिलांसह थोरांना तो अध्यात्मीक संस्कृतीत रममाण करतो. तर लहानांच्यात नवचैतन्य निर्माण करतो. दरम्यान या मुलांच्या गणेशोत्सवाच्या पूर्वसंधेपासून ते चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशीही परिक्षा असल्याने याबाबत जीवनरक्षा प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी नगरसेवक राजू मसूरकर यांनी नाराजी व्यक्त करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.हिंदू धर्मातील गणेश चतुर्थी सणाला लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. घराघरात गणपती असल्याने सर्व लहान मुलांना आपल्या नातेवाईकांसोबत, मित्रांसोबत आनंद लुटता येतो. तसेच एकमेकातील कटूता दूर व्हावी, देशप्रेम जागृत व्हावे हा उदात्त हेतू लाकमान्य टिळकांनी ठेवला होता. मात्र, टिळकांच्या हा उद्देश महाराष्ट्रातील सर्व शिक्षण संस्थामधून पायदळी तुडविला जात असून, प्रामुख्याने शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या गोष्टीकडे कानाडोळा केला आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्यादिवशी, तसेच चतुर्थीच्या तिसऱ्यादिवशी अनेक शिक्षणसंस्थामध्ये पाचवी ते आठवी, अकरावी ते बारावी तसेच कॉलेजच्या परीक्षाही सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना गणेश चतुर्थी सणाचा आनंद लुटता येत नाही. ज्याप्रमाणे विविध क्षेत्रात निषेध व्यक्त केला जातो त्याप्रमाणे शिक्षणसंस्था व कुलगुरूंकडे निषेध व्यक्त करुन हिंदू धर्मातील सणांची आठवण करुन देण्याची गरज असल्याचे मत जीवनरक्षा प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी नगरसेवक राजू मसूरकर यांनी पत्रकात म्हटले आहे. चतुर्थीच्या दिवसात असणाऱ्या या परीक्षा रद्द करुन आठ दिवस सुट्ट्या शिक्षणसंस्थेने जाहीर कराव्यात, अन्यथा हिंदू धर्मियांच्या विविध संघटनांच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा राजू मसूरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. (वार्ताहर)