शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आरक्षित प्रभागांत उमेदवारांचा दुष्काळ

By admin | Published: October 04, 2015 10:09 PM

वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणूक : खुल्या प्रभागांवरुन युती आघाडीत रस्सीखेच

प्रकाश काळे - वैभववाडी -वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या खुल्या प्रभागात सर्वच पक्षांच्या इच्छुकांची भाऊगर्दी असून आरक्षित प्रभागांमध्ये उमेदवार शोधताना सर्वांच्याच नाकीनऊ आले आहेत. आघाडी आणि युतीमध्ये खुल्या प्रभागांवरुन रस्सीखेच सुरू आहे. अद्याप कोणत्याही पक्षाचे १७ उमेदवार निश्चित होवू शकलेले नाहीत. त्यामुळे नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी शेवटचे चारच दिवस उरल्याने इच्छुकांमध्ये कोणी कोणाकडून लढायचे? याबाबत संभ्रमाची स्थिती दिसून येत आहे.वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीच्या १७ पैकी १३ प्रभाग विविध प्रवर्गांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे उर्वरित प्रभाग क्रमांक एक, पाच, अकरा आणि पंधरा या चार प्रभागांमध्ये बड्या इच्छुकांच्या उड्या पडल्या आहेत. मात्र, राजकीय पक्षांनी खुल्या प्रभागातील उमेदवारीवरुन बंडखोरी टाळण्यासाठी अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे. आघाडी आणि युतीमध्ये खुल्या प्रभागांवरुन रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळेच आघाडी व युतीचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही.आघाडी आणि युतीला बाजूला ठेवण्यासाठी वाभवे गावठाण भागात पक्ष विरहित विकास आघाडीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गावठाण भागात कोणीही कोणत्याच राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची नाही, असा मतप्रवाह तयार झाला आहे. सर्व पक्ष स्वबळावर लढणार असतील तर कदाचित पक्ष विरहितचा ट्रेंड बाजूला पडून त्यातीलच काहीजण विविध पक्षांचे झेंडे घेऊन फिरताना दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्ष विरहितचा ट्रेंड कितपत यशस्वी ठरतो हे पाहण्यासाठी पुढील चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.उमेदवारांची पळवापळव ; सक्षम उमेदवारांची प्रतीक्षा कायमअनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक ३ आरक्षित आहे. मात्र या प्रभागात काही पक्षांना उमेदवारच मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे कदाचित या प्रभागात झालीच तर दुरंगी लढत नाहीतर बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील स्त्री आणि पुरुष उमेदवारांसाठी सर्वच पक्षांचे पदाधिकारी कमीअधिक प्रमाणात लोकांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, अजूनही काही प्रभागात सक्षम उमेदवारांची प्रतीक्षा कायम आहे.मागील चार दिवसात राजकीय पक्षांनी उमेदवारांची जुळवाजुळव केली होती. मात्र, आदल्या दिवशी एका पक्षाने निश्चित केलेला उमेदवार दुस-या दिवशी दुसऱ्याच पक्षाच्या तंबूत दिसून येत आहे. त्यामुळे एकेका प्रभागात उमेदवारांसाठी दोन तीन वेळा शोधमोहीम राबवावी लागत आहे. उमेदवारांची पळवापळवी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सुरू राहण्याची चिन्हे दिसत आहेत.सतरा उमेदवारांचे आव्हानआघाडी आणि युतीबाबत अजूनही संभ्रमाची स्थिती आहे. आघाडी व युतीचा निर्णय वेळीच झाला नाही; तर चारही प्रमुख पक्षांना स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे या पक्षांपुढे सर्व सतरा प्रभागांमध्ये उमेदवार मिळविण्याचे कठीण आव्हान आहे. हे आव्हान कोण कसे पेलवणार यावरही नगरपंचायत निवडणुकीचे बरेचसे यश अवलंबून राहणार आहे.