ठळक मुद्देमहिलेचे अहवाल निगेटिव्ह असल्याची प्रशासनाची माहिती
सावंतवाडी : मुंबईहून ओटवणे येथे बाळंतपणासाठी आणलेल्या महिलेला सोडणाऱ्या कारचा भुदरगड आकुर्डी येथील चालक पॉझिटिव्ह निघाल्याची खळबळजनक माहिती प्राप्त झाली आहे. सदर महिलेला सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृहावर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
सध्या या महिलेची प्रसूती झाली असून ती ओरोस येथील शासकीय रुग्णालयात आहे. मात्र, सदर महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे. यामुळे काही प्रमाणात येथील प्रशासनाने सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. मात्र, सदर चालक ओटवणे येथे तिला सोडण्यासाठी आलेला असताना त्याच्या संपर्कात अन्य कोणी आले होते का याबाबत तपास केला जाणार आहे.