सिंधुदुर्गनगरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील बांदा सटमटवाडी येथे गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत ३ लाख २२ हजार ४४० रुपयांच्या अवैध दारूसह एकूण ८ लाख २२ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर बिगरपरवाना गोवा बनावटीची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी भीमराम रामु चव्हाण (३८, रा. जरळी, गडहिंग्लज, कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले.मुंबई-गोवा महामार्गावरून अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर उपायुक्त व सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस येथील भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत, दुय्यम निरीक्षक जी. एल. राणे, आर. डी. ठाकूर, दीपक वायदंडे, आर. एस. शिंदे यांच्या टीमने बांदा सटमटवाडी येथे सापळा रचला होता.त्यानुसार शुक्रवारी या पथकाने बांदा-सटमटवाडी येथे महामार्गावरील धाबा येथे सिल्व्हर रंगाची कार (एम. एच. ४३ एएफ २८६१) या पथकाने थांबण्याचा इशारा करत ही कार तपासली असता त्यात ३ लाख २२ हजार ४४० रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या दारुचे ४० बॉक्स आणि अवैध दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली ५ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ८ लाख २२ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गोवा बनावटीची बिगर परवाना अवैध दारू वाहतूक प्रकरणी भीमराम चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले आहे.
दारूसह कार ताब्यात, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:39 PM
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील बांदा सटमटवाडी येथे गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत ३ लाख २२ हजार ४४० रुपयांच्या अवैध दारूसह एकूण ८ लाख २२ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर बिगरपरवाना गोवा बनावटीची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी भीमराम रामु चव्हाण (३८, रा. जरळी, गडहिंग्लज, कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले.
ठळक मुद्देदारूसह कार ताब्यात, उत्पादन शुल्क विभागाची कारवाईगडहिंग्लजमधील एकाला अटक