शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मुंबई-गोवा महामार्गावर नडगिवे येथे कार-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 12:38 PM

दुचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारला समोरून जोरदार धडक

कणकवली/खारेपाटण : मुंबई - गोवा महामार्गावर खारेपाटण जवळच असलेल्या नडगिवे येथे एका अवघड वळणावर कार-दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. व्हॅनिश हजायॉ डिसोझा (वय  २७, रा. कुर्ला, गावठाण मुंबई) असे जखमी तरुणाचे नाव आहे. हा अपघात आज, गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडला.याबाबत मिळालेली माहिती अशी की, विदर्भ कोकण ग्रामीण सहकारी बँकेचे रत्नागिरी खेड येथील अधिकारी सुनील सतीश तळवेलकर, सागर नवनाथ गायकवाड, प्रफुल्ल कुमार डंगे, नरेंद्र पांडुरंग चव्हाण, प्रबोध गोपाळ हिंदळेकर हे सर्व  कणकवली येथील बँकेची बुधवारची मिटिंग संपवून आज, सकाळी कार क्रमांक (एम.एच.-०५-डी.एस.-३१८३) मधून खेड येथे चालले होते. तर, व्हॅनिश डिसोजा हे आपल्या दुचाकी क्रमांक (एम.एच.-०३-जे.-१२६६) वरुन गोव्याच्या दिशेने निघाले होते.दरम्यान, नडगिवे येथे एका अवघड वळणावर दुचाकीस्वार व्हॅनिश डिसोजा याचा गाडीवरचा ताबा सुटल्याने तो जोरदार समोरून येणाऱ्या कार वर आदळला. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच नडगिवे सरपंच अमित मांजरेकर, उपसरपंच अरुण कर्ले, भावेश कर्ले, सामाजिक कार्यकर्ते भाऊ राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी डिसोझा याला पुढील उपचाराकरिता कणकवली पाठविले. खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे अधिकारी  मोहिते यांनी अपघातस्थळी तातडीने भेट देऊन ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरची दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याचे काम पूर्ण करावेमुंबई - गोवा महामार्गावरील नडगिवे येथील हे अवघड वळण 'वन व्हे ' ठेवण्यात आले असून याठिकाणी वारंवार अपघात घडत आहे. त्यामुळे हे अपूर्ण असलेले रस्त्याचे काम महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण न केल्यास अजूनही येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे काळाची गरज आहे. या अपघाताचा अधिक तपास खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात