कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग खराब झाल्याने त्यावर दिवाळीपूर्वी कारपेट करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत व आपण बांधकाममंत्र्यांकडे केली होती. त्याची दखल घेऊन हे काम करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले असून या कामाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिलीे.महामार्गाची दुरवस्था झाल्याने गणेशोत्सवापूर्वी त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु पावसामुळे या रस्त्यावरील भरण्यात आलेले खड्डे पुन्हा दिसू लागले आहेत. सिंधुदुर्गातील महामार्गाची तसेच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. त्यासाठी या रस्त्यावर कारपेट करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे खासदार राऊत व आपण महामार्गावर कारपेट करण्याची मागणी केली. त्याची दखल घेऊन त्यांनी तत्काळ या कामाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार या कारपेटच्या कामाचा १0 कोटींचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी शासनास सादर केला असून त्या प्रस्तावाला मंजुरी देऊन दिवाळीपूर्वी काम करण्यात येईल, असे बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, सचिव तामसेकर तसेच सी.पी.जोशी यांनी चर्चेदरम्यान सांगितल्याची माहिती आमदार नाईक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कारपेट
By admin | Published: September 30, 2016 11:10 PM