सिंधुदुर्ग : आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक संधी आपण वाया घालवतो. अन् नंतर पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे मुंबईसारख्या शहरातील १९८७ मध्ये शिवाजी विद्यालयातून शालेय शिक्षण संपवून बाहेर पडलेल्या मुलांच्या ग्रुपने यंदा आपले स्नेहमेळावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे गावात कदमवाडी येथील नाम्या महादू निवासी वसतीगृहातील आदिवासी मुलांसोबत साजरा केला.आपल्या गावच्या भागासाठी काहीतरी देणे लागतो या भावनतून चौकशी करता वसतीगृहाचे संचालक उदय अहिर हे आदीवासी मुलांसाठी वसतीगृह चालवतात. त्यामध्ये २२ ते २५ मुले वसतीगृहात असून ते जवळच्या शाळेत शिक्षण घेतात. त्यांची गरज लक्षात घेऊन शिवाजी शाळेत शिक्षण घेतात.
त्यंची गरज लक्षात घेऊन शिवाजी विद्यालयातील १९८७ च्या मित्र परिवाराकडून गृहोपयोगी साहित्य ज्यामध्ये पेन, टॉवेल्स, चादरी, ब्लेंकटस्, सतरंजी, साबण, टुथपेस्ट, टुथब्रश, खाण्याचे पदार्थ याचे वाटप केले. यावेळी मित्रपरिवाराने अहीर यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सामाजिक जाण ठेवून औचित्य साधणाऱ्या मित्रपरिवाराच्या सौजन्याबद्दल अहीर यांनी आभार व्यक्त केले.