मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदारांच्या केंद्रीय समितीतील अध्यक्ष गिरीश बापट, खासदार विनायक राऊत यांच्यासह अन्य खासदारांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट देत पाहणी केली. यावेळी शिवराजेश्वर मंदिरात जात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले.मिनी पार्लमेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदार सदस्य असलेल्या केंद्रीय समितीने सोमवारी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. त्यानंतर या समितीतील अध्यक्ष गिरीश बापट, खासदार विनायक राऊत, खासदार जुगल किशोर शर्मा, खासदार सुदर्शन भगत यांनी येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली.यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, मंदार केणी, यतीन खोत, उमेश मांजरेकर, श्वेता सावंत, सेजल परब, पूनम चव्हाण, तृप्ती मयेकर, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, प्रभाकर जाधव यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी खासदार शर्मा म्हणाले, आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान, महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरास भेट देता आली. खासदार विनायक राऊत हे संसदेत सातत्याने येथील विकासकामांबाबत आवाज उठवीत असतात, असेही ते म्हणाले.
केंद्रीय समिती सदस्यांची किल्ले सिंधुदुर्गला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 4:17 PM
Fort Sindhudurgnews- सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदारांच्या केंद्रीय समितीतील अध्यक्ष गिरीश बापट, खासदार विनायक राऊत यांच्यासह अन्य खासदारांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट देत पाहणी केली. यावेळी शिवराजेश्वर मंदिरात जात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले.
ठळक मुद्देकेंद्रीय समिती सदस्यांची किल्ले सिंधुदुर्गला भेट