शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

पर्यटनच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न

By admin | Published: September 06, 2016 9:55 PM

सुरेश प्रभू-विनायक राऊत : केंद्रीय मंत्री येणार जिल्हा दौऱ्यावर

मालवण : कोकणचा गतिमान विकास होत असताना अनेक समस्या भेडसावत आहेत. पर्यटनातून विकास साधण्यासाठी सीआरझेडचा ठरणारा अडसर दूर करण्यासाठी केंद्रशासन प्रयत्नशील आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनात येणाऱ्या अडचणी तसेच समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय पर्यटनमंत्री व पर्यावरण मंत्री लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. राज्यशासनाच्या प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत याबाबतची प्रमुख बैठक रत्नागिरी-सिंधुदुर्गात आयोजित करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मालवण मेढा येथील मंत्री प्रभू यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन खासदार विनायक राऊत यांनी घेतले. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितीन वाळके उपस्थित होते. खासदार म्हणून अनेक वर्षे सुरेश प्रभू यांनी प्रतिनिधीत्व केले. आता याच मतदारसंघातून विनायक राऊत हे खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत. प्रभू हे देशाचे केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून काम पाहत असताना एकाच मतदार संघातील या दोन खासदारांची दोन्ही जिल्ह्याच्या विकासाबाबत झालेली चर्चा लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष्य लागून आहे. (प्रतिनिधी)पर्यटन समस्या सोडविणारसिंधुदुर्गचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून होत असताना येथील गडकिल्ल्यांची दुरुस्ती महत्वाची आहे. सीआरझेड कायद्याचा अडसरही लक्षात घेता त्यात शिथिलता देण्याबाबतही सकारात्मक विचार गरजेचा आहे. याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन व अन्य समस्या जाणून घेताना त्याही सोडवण्यावर भर दिला जाईल. स्वदेश दर्शनमधून विकासाला गतीकेंद्र व राज्यसरकारच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यांचा गतिमान विकास साध्य केला जाईल. याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच स्वदेश दर्शनच्या माध्यमातून सिंधुदुर्गला केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. मालवणसह किनारपट्टीचा पर्यटनातून विकास करताना पर्यटक व स्थानिकांना येणाऱ्या समस्या बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.