चाकरमानी परतीच्या प्रवासाला : सर्वसामान्य प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 03:40 PM2018-09-20T15:40:55+5:302018-09-20T15:43:01+5:30

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल झालेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे रेल्वेच्या नियमित गाड्यांसह जादा गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.

Chakarmani return journey: Normal passenger traffic | चाकरमानी परतीच्या प्रवासाला : सर्वसामान्य प्रवाशांचे हाल

कोकण रेल्वे मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर मुंबईकर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात मोठी गर्दी होत आहे. (छाया : अनिकेत उचले)

googlenewsNext
ठळक मुद्देचाकरमानी परतीच्या प्रवासाला : सर्वसामान्य प्रवाशांचे हालकोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना प्रचंड गर्दी

कणकवली : गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल झालेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे रेल्वेच्या नियमित गाड्यांसह जादा गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. त्यातून लाखोंच्या संख्येने चाकरमानी सिंधुदुर्गात आले होते. आता हे चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. त्यामुळे सर्व रेल्वे गाड्या प्रवाशांनी फुल्ल होत आहेत.

दिवा पॅसेंजर, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, तूतारी, कोकण कन्या एक्सप्रेस व मंगलोर एक्सप्रेस या नियमित रेल्वे गाड्याही प्रवाशांनी फुल्ल होत आहेत. तसेच जादा गाड्यगही फुल्ल होत आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना उभ्यानेच प्रवास करावा लागत आहे.

पुढील काही दिवस गर्दीचेच!

सिंधुदुर्गातच सर्व गाड्या फुल्ल झाल्याने रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यातील प्रवाशांना या गाड्यांमध्ये चढताच येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी त्रस्त प्रवाशांकडून होत आहे. मंगळवारी तसेच बुधवारीही सर्व रेल्वे गाड्यांना गर्दी होती. पुढील काही दिवस अशीच गर्दी रेल्वेला असण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Chakarmani return journey: Normal passenger traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.