शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
4
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
5
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
6
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
7
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
8
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
9
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
10
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
11
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
12
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
13
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
14
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
15
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
16
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
17
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
18
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
19
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
20
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती

कोकणात धुवाँधार पावसाची शक्यता; सिंधुदुर्गात रेड तर रायगड, रत्नागिरीत यलो अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 6:48 AM

११ जुलैपर्यंत कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला रविवारी सकाळी पावसाने धडकी भरविली असतानाच दुपारी, सायंकाळ मात्र कोरडी गेली, तर दुसरीकडे ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमध्ये पावसाने धुवाँधार बॅटिंग केली असून, या पावसाचा जोर उत्तरोत्तर वाढत असल्याने सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत सिंधुदुर्गला रेड तर रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, ११ जुलैपर्यंत कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 मुंबईत सकाळी पावसाने बऱ्यापैकी जोर पकडला होता. सकाळी ९ वाजेपर्यंत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचा रविवार पाण्यात जाईल, अशी भीती होती. प्रत्यक्षात मात्र सकाळी १० नंतर पावसाने मुंबईकडे पाठ फिरवली. 

 सायंकाळी ६ वाजेपर्यंत हवामान ढगाळ असेल तरी पावसाचा कुठेच पत्ता नव्हता. सिंधुदुर्गातील आवळेगाव येथे रविवारी दुपारी ३:४५ वाजेपर्यंत २३९ मिमी पावसाची नोंद झाली. 

 अत्यंत जोरदार पाऊस म्हणून या पावसाची नोंद झाली असून, नद्या-नाल्यांना पूर येईल. त्यामुळे स्थानिकांनी खबरदारी घ्यावी, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. तसेच मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

मोठ्या पावसाच्या नोंदी / मिमीलोणावळा     १२९ पनवेल     १२१ कर्जत     ११५ मुरबाड     ११५माथेरान     २२० मंडणगड (रत्नागिरी)      १०५ संगमेश्वर (रत्नागिरी)     १०२ लांजा (रत्नागिरी)     १०२ राजापूर (रत्नागिरी)     १३५ अंबोली (सिंधुदुर्ग)     २३३ 

टॅग्स :konkanकोकणRainपाऊसRaigadरायगडRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग