कणकवली : स्वतःचा कोल्हापूर मतदार संघ सोडून ज्यांना दुसरीकडे लढावे लागते . त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू नये, उद्धव ठाकरे यांना शेतीतले काय कळते ? असे विचारणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केवळ आपले प्रदेशाध्यक्षपद वाचावे म्हणूनच कृषी विधेयकाचे समर्थन केले असल्याचा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला.कणकवली येथिल शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आमदार वैभव नाईक, लोकसभा मतदार संघ समन्वयक प्रदीप बोरकर,संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,जिल्हा प्रमुख संजय पडते,कामगार नेते आप्पा पराडकर,अतुल रावराणे,युवा नेते संदेश पारकर,बाळा भिसे,रवींद्र जोगल,विकास कुडाळकर, नीलम पालव,नागेंद्र परब, अमरसेन सावंत, मिलिंद साटम, विलास साळसकर, आबा दुखंडे, तालुका प्रमुख शैलेश भोगले,प्रथमेश सावंत, हर्षद गावडे, नगरसेवक सुशांत नाईक, सुजित जाधव, शेखर राणे, तेजस राणे,प्रदीप सावंत,मीनल तळवडेकर, साक्षी आमडोस्कर, माधुरी दळवी, संतोष शिरसाट आदी उपस्थित होते.उदय सामंत म्हणाले, कृषी विषयक कायदा किती घातक आहे हे गावोगावी जाऊन सांगावे लागेल. ज्यावेळी कायदा रद्द होईल तेव्हा खऱ्या अर्थाने कोकणातील शेतकऱ्यांना फायदा होईल. कोकणातील तीन जिल्ह्यात ,उच्च शिक्षण,उद्योग आणि पर्यटनाच्या माध्यमातून हजारो रोजगार आणणार असून '"इनोव्हेटिव्ह कोकण" रोजगार निर्मिती उद्योग सुरू करण्यात येईल. राजकीय कोरोनाचा अंत होण्याची आजपासून नांदी सुरू झाली आहे.त्यामुळे आता विकास पर्व सुरू झाले असून कोरोनामुळे राहिलेल्या कामांचा शुभारंभ लवकरच करण्यात येईल.ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाचा दौरा असेल तेव्हा एक तास वेळ कणकवलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात देणार आहे. तर जनतेचे प्रश्न माझ्या पर्यंत पोचविण्यासाठी माझा एक स्वीय सहाय्यक या कार्यालयात उपस्थित राहील.प्रवेशाचा कार्यक्रम पाहून अनेकांच्या पायाखालची वाळू घसरली असेल.कणकवलीतीलदोन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सत्ता शिवसेनेच्याकडे द्या मग विकास काय असतो ते दाखवतो.
जिल्हाचे वैभव वाढविण्यासाठी आमदार वैभव नाईक यांचे संरक्षण वाढवले, फक्त दिल्लीतून संरक्षण वाढत नाही तर राज्यातून संरक्षण वाढविता येते हे यानिमित्ताने दाखवून दिले आहे. चिपी विमानतळासाठी श्रेयवादात जायचे नाही जे काही विकासाचे करते ते शिवसेनाच करते हे आता सिद्ध झाले आहे . म्हणूनच काही लोक हतबल झाले आहेत.श्रेयवाद हा फुटकळ आहे,आम्ही जनतेला न्याय देत आहोत. सिंधुदुर्ग जिल्हयात विकास कामासाठी डीपीडिसी चा पैसा देत राहू असे सांगतानाच ८० टक्के ग्रामपंचायती शिवसेनेकडे येणार असल्याने विरोधक हतबल झाल्यामुळे विरोधात अफवा पसरवित आहेत.ग्रामपंचायत हे उद्दिष्ट नाही तर जिल्हा परिषद निवडणूकीची ही रंगीत तालीम आहे.यावेळी वैभव नाईक म्हणाले, शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय खऱ्या अर्थाने मध्यवर्ती आहे . कारण एका बाजूला तहसील कार्यालय ,प्रांताधिकारी कार्यालय तर दुसऱ्या बाजूला उपजिल्हा रुग्णालय तर दुसऱ्या बाजूला बांधकाम कार्यालय व माझे कार्यालय आहे . त्यामुळे खऱ्या अर्थाने मध्यवर्ती कार्यालयातून विकासाचे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील .पीक विम्याचा फायदा होत होता तो आता बंद झाला.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करण्याचे काम या ठिकाणचे आमदार करत आहेत.जिल्हयात मेडिकल कॉलेज मंजूर केले आणि सिंधुदुर्गचे प्रेम उद्धव ठाकरे यांनी दाखवले.पालकमंत्री यांनी खूप चांगले काम कोरोनाचा काळात केले.मात्र त्यांचेवर आरोप करण्याचे काम या ठिकाणचे विरोधक करत आहेत. जनतेचे प्रश्न सोडविणारे हे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय झाले पाहिजे. ठेकेदार मात्र या कार्यालयात नकोत असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.यावेळी आशिये,तरंदळे ,कलमठ, भरणी येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. आशिये माजी सरपंच रश्मी बाणे यांच्यासह अनेकानी भगवा खांद्यावर घेतला. सूत्रसंचालन बाळू मेस्त्री यांनी केले.संचयनी प्रकरणात बदनाम करण्याचा प्रयत्नआमदार नितेश राणे यांची ही शेवटची टर्म आहे. यापुढे त्यांना संधी नाही .शिवसेना ही सर्वाना सोबत घेऊन चालते.हे विरोधक किती जणांना धमक्या देणार ? त्यांच्या या टोळीतून आम्हाला बाहेर काढले त्याबद्दल खासदार विनायक राऊत यांचे आभार मानतो. मला संचयनी प्रकरणात बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे. मी संचयनीत हाऊसिंग डिपार्टमेंट मध्ये काम केले आहे.
जर मी घोटाळ्यात अडकलो होतो तर मला २० वर्षे तुमच्याबरोबर का ठेवले ? तुमच्या संस्था उभारणीत मी काम केले आहे. हे तुम्ही विसरला आहात. आम्ही आग्रह केला नव्हता तरी समाज सेवेच्या नावाखाली तुमच्या दोन्ही मुलांना समाजकार्यात आणले .या पूर्वी तुम्ही काँग्रेसमध्ये होता.तुम्ही जात होता तिथे आम्हाला फरफटत नेले.
कृषी विधेयकाचे समर्थन केले पण कृषी विधेयकाचा फायदा काय होणार ? ते समोरासमोर येऊन सांगावे,कामाची टक्केवारी कोण घेतो ? हे जाहीर करा. जर हे खोटे असेल तर एका व्यासपीठावर या , मी त्याचे पुरावे देतो असे आव्हान सतीश सावंत यांनी यावेळी दिले.