सावंतवाडी : राज्यात 26/11 हा शहीद दिन पाळला जातो आणि असे असतना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार गुवाहाटीला गेले आहेत ते शहीद दिनाचे कार्यक्रम पूर्ण करूनच गेले आहेत. भ्रष्टाचारी सरकार गेल्याची इच्छा 40 आमदारांची इच्छा पूर्ण झाली असल्यानेच ते नवस फेडण्यासाठी गेले त्यात गैर काय असा सवाल भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.
तसेच कर्नाटक सरकारने कितीही मागणी केली तरी एक इंच जमिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना कर्नाटकात जाणार नाही याची खात्री ही त्यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, अतुल काळसेकर, संजू परब, मनोज नाईक उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार आसाम गुवाहाटी ला गेले आहेत त्यांना खासदार संजय राऊत यांनी 40 रेडे गुवाहाटीला गेल्याचे म्हटले होते. त्यावर बावनकुळे यांनी आमदारांना रेडे म्हणणे योग्य नाही असे सांगितले. राज्यपालांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्ष महाराष्ट्र बंद करण्याची हाक देत आहे मात्र राज्यात विरोधी पक्ष आहे तरी कुठे असा सवाल बावनकळे यांनी केला.
राज्यातील सरकार आज जाईल उद्या जाईल असे म्हटले जाते यावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी राज्यात विरोधी पक्षच नाही आणि आहेत ते आमदार टिकवण्यासाठी काहीजण अशी वक्तव्य करून लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतात पण उद्धव ठाकरेंकडून आता आमदार ही बाजूला जायला लागलेत भविष्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे ही आमदार जातील असे सांगितले.
महाराष्ट्रात 26 /11 हा शहीद दिन पाळला जातो या दिवशीच मुख्यमंत्री शिंदे 40 आमदारांसह आसाम गुवाहाटीला गेल्यामुळे सर्व थरातून टीका होते यावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शहीद दिनाचे कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केले आहेत त्यानंतरच ते गुवाहाटीला गेले कदाचित भ्रष्टाचारी अनाचारी व दुराचारी सरकार सत्तेवरून गेल्यानंतर आई कामाख्या देवीचा नवस फेडणे हे ही त्याच्यासाठी महत्त्वाचे असेल.
आपण हिंदू धर्मिय असून देवावर श्रध्दा ठेवणारे असल्याचेही बावनकुळे यांनी सांगत बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या गुवाहाटीच्या दौऱ्याचे समर्थन केले.