बांदा : बांदा-सटमटवाडी येथील आरटीओच्या (उपप्रादेशिक परिवहन कार्यालय) सीमा तपासणी नाक्याचे काम स्थानिक प्रशासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता करण्यात येत आहे. त्यामुळे हे काम खासगी कंपनीच्या फायद्यासाठी होत असल्याचा संशय येत आहे. शिवाय प्रकल्पग्रस्त तसेच स्थानिकांना पूर्णपणे सामावून घेऊन हा प्रकल्प पर्यटन व व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन विकसित करावा. यासाठी आमच्या मागणीनुसार प्रकल्पाच्या आराखड्यात बदल करावा, अशी मागणी बांदाचे सरपंच मंदार कल्याणकर यांनी ‘एमएसआरडीसी’चे मुख्य अभियंता दिलीप साळुंखे व अधीक्षक अभियंता सतीश साळुंखे यांना केली.बांदा-सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्याच्या कामाच्या पाहणीसाठी ‘एमएसआरडीसी’चे मुंबई येथील अधिकारी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत ‘आरटीओ’चे अधिकारी उपस्थित होते. बांदा ग्रामपंचायत कार्यालयात या प्रकल्पाबाबत चर्चा करताना सरपंच मंदार कल्याणकर यांनी या प्रकल्प आराखड्यातील त्रुटींबाबत सविस्तर चर्चा केली.बांदा ग्रामपंचायतीला या प्रकल्पाबाबत कोणतीही कल्पना न देता काम सुरू करण्यात आल्याने सरपंच मंदार कल्याणकर, माजी सरपंच शीतल राऊळ यांनी मुंबई येथे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन (पान ९ वर)
बांदा तपासणी नाका आराखडा बदला
By admin | Published: March 31, 2016 12:14 AM