रत्नागिरी : गणेशोत्सवामध्ये गेल्या पााच दिवसांत जिल्हा परिषद आरोग्य पथकांनी ९० हजार ७४५ चाकरमान्यांची तपासणी केली. त्यामध्ये ३९४ रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले असून, मलेरियाचे १०२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.गणेशोत्सवासाठी मुंबईहून बहुसंख्य चाकरमानी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात. त्यामुळे जिल्ह्यात कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्लू, डेंग्यू या रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्ह्यात सतर्कता बाळगण्यात येणार आहे.बसस्थानके, रेल्वे स्थानक ८ आरोग्य पथके तसेच महामार्गावर १७ वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील आरोग्य पथके दि. ३ ते ५ सप्टेंबर व दि. ७ ते ९ सप्टेंबर या कालावधीत कार्यरत राहणार आहेत. यामध्ये २ आरोग्य कर्मचारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आरोग्य पथकांकडून चाकरमान्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांत ९० हजार ७४५ चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १०२ संशयित मलेरियाच्या रुग्णांचे रक्त नमुनेही घेण्यात आले आहेत. रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ४९४ चाकरमान्यांवर औषधोपचार करण्यात आले. मलेरियाच्या संशयित रुग्ण आणि औषधोपचार करण्यात आलेल्या रुग्णांचा घरचा पत्ता घेण्यात आला. त्यानंतर आरोग्य विभागाने त्या रुग्णाच्या गावच्या परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्यास कळविले आहे. त्यामुळे त्या चाकरमानी असलेल्या रुग्णांच्या राहत्या घरीही औषधोपचार करण्याची काळजी आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे. मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांकडूनही आरोग्य पथकाला सहकार्य मिळत आहे.यावेळी कावीळ, कॉलरा, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्लू, डेंग्यू यापैकी मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)दिनांकएकूणमलेरियाचेऔषधोपचारतपासलेले रुग्णसंशयित रुग्णकेलेले रुग्ण२५ आॅगस्ट५०९५१५१५२६ आॅगस्ट१३४४६३०९०२७ आॅगस्ट२११५७१९५५२८ आॅगस्ट२८९८०१८१३६२९ आॅगस्ट२२०६६२०९५१०२ मलेरियाचे संशयित रुग्ण सापडले.३९४ चाकरमान्यांवर औषधोपचार.जिल्ह्यात महामार्गावर विविध ठिकाणी २५ आरोग्य पथके कार्यरत.महानगर पालिका क्षेत्रातून कोकणात येणाऱ्यांवर लक्ष.
९० हजार चाकरमान्यांची तपासणी
By admin | Published: August 31, 2014 11:02 PM