शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मुख्यमंत्री शनिवारी नाणीज दौऱ्यावर

By admin | Published: October 14, 2016 12:37 AM

विविध कार्यक्रम : सरसंघचालक भागवत यांच्या हस्ते १६ रोजी कार्यक्रम

रत्नागिरी : जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे आयोजित ७३ हजार ३५२ रक्ताच्या बाटल्यांचा संकल्पपूर्ती सोहळा तसेच मरणोत्तर देहदानाचा संकल्प करणाऱ्या ५६ हजार ५३७ दात्यांचा सत्कार असे दोन कार्यक्रम शनिवार व रविवारी होणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नाणीज येणार आहेत.जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा यंदा ५० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने संस्थानतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून रक्ताचे संकलन आणि देहदानाचा संकल्प असे दोन महत्वपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आले होते.आतापर्यंत ५६ हजार ५३७ दात्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. या दात्यांचा सत्कार १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री रवींद्र वायकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कृषीमंत्री सदाभाऊ खोत व खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत.याचबरोबर रविवारी १६ आॅक्टोबर रोजी ७३ हजार ३५२ रक्तबाटल्यांचा संकल्पपूर्ती सोहळा सकाळी ११ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार नानाभाऊ पटोले उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)लष्करासाठी रक्तदानसीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी संस्थानतर्फे ७ हजार ८७० रक्ताच्या बाटल्या सुपुर्द करण्यात येणार आहेत, तर उर्वरित ६५ हजार ४८२ राज्य शासनाकडे देण्यात येणार आहेत. या महारक्तदान संकल्पपूर्ती सोहळ्यासाठी गेले दोन महिने राज्यभरात विविध ठिकाणी संस्थानतर्फे रक्तदान शिबिरे सुरु होती.गडकरी, पर्रीकरही येणाररविवारी होणाऱ्या महारक्तदान संकल्पपूर्ती सोहळ्यासाठी मोहन भागवत यांच्यासोबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर हेही उपस्थित राहणार आहेत.