शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

चिपी ते गोवा सागरी महामार्ग उभारणार

By admin | Published: June 18, 2015 10:34 PM

दीपक केसरकर : वेंगुर्लेचा पर्यटनदृष्ट्या विकास साधणार; ११५ कोटींचा खर्च अपेक्षित

वेंगुर्ले : वेंगुर्लेचा पर्यटनदृष्टीने विकास करण्याच्या उद्देशाने पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता चिपी विमानतळ ते गोवा असा सागरी महामार्ग केंद्र सरकारच्या सुमारे ११५ कोटी खर्चातून उभारला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या विश्रामगृहात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वेंंगुर्लेच्या आरोग्य सुविधेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय इमारतीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत ५० खाटांचे अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त रुग्णालयाची पायाभरणी लवकरच केली जाईल. तसेच सध्या सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील रिक्तपदे तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्री जिल्हा नियोजन बैठकीत तरतूद केलेल्या अंदाजपत्रकातून त्वरित पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. वेंगुर्ले मच्छिमारी बंदर विकसित करण्याच्या उद्देशाने येथील मच्छिमारांच्या नौका व ट्रॉलर्स खाडीत सुरक्षित राहण्याकरिता कायमस्वरूपी ड्रोजर खरेदी केला जाणार असून, शासनाकडे आणखी एक उपलब्ध असलेला ड्रोजरच्या मदतीने खाडीतील गाळ खाडी पात्राच्या बाहेर काढून तो गाळ शासनाचा महसूल वाढविण्याकरिता दिला जाणार आहे. यातून मच्छिमारांचा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. वेंगुर्ले पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याच्या उद्देशाने येथील पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे. याकरिता अभ्यास समिती गठीत करून त्याच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून आराखडा तयार केला जाईल. सावंतवाडीत असलेला ड्रेनेज प्रकल्प वेंगुर्लेत राबविला जाणार आहे. तसेच भुयारी गटार योजना सर्वसमावेशक करण्याकरिता नगरपालिकेशी चर्चा केली जाईल. विद्यार्थी व नागरिकांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची सत्यप्रत तातडीने उपलब्ध होण्याकरिता विशेष कार्यकारी अधिकारी यांची जिल्ह्यात नेमणूक केली जाईल. तसेच विविध कमिट्या व समित्यांवर नियुक्या करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यावेळी वेंगुर्ले तालुका शिवसेनाप्रमुख सुरेश नाईक, शहरप्रमुख विवेक आरोलकर, सचिन वालावलकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नागरिकांना प्रशिक्षित केले जाणारवायंगणी येथे कासव म्युझियम, वेंगुर्ले नवाबाग येथे फिशनमन व्हिलेज, मांडवीखाडी येथे झुलता पूल, वेंगुर्ले तिठा ते कुडाळ तिठा रस्ता दुरुस्ती व नूतनीकरण, झाराप रेल्वेस्थानकाकडे जाणारा आडेली-झाराप रस्ता नूतनीकरण, वेंगुर्ले मठ येथील पुलाचे नवीन बांधकाम व रस्ता नूतनीकरण, मठ शिवाजी चौक येथील धोकादायक वळणावरील अपघात टाळण्याकरिता गतिरोधक अशी विविध कामे केली जातील.रोजगार निर्मितीकरिता येथील साधन सामग्री व उत्पादनांवर आधारित प्रकल्प यासाठी येथील नागरिकांना प्रशिक्षित केले जाणार आहे.