शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

चिपळूण --विधानसभा क्षेत्रात सेनेत नाराजी; राष्ट्रवादी फायद्यात

By admin | Published: October 01, 2014 11:06 PM

मतदार संघातील गणिते बदलली

सुभाष कदम -- चिपळूण ----विधानसभा क्षेत्रात शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी आहे. शिवसेना - भाजप युतीमधील आतापर्यंतचा मित्र असणारा भाजप व काँग्रेस स्वतंत्र निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे या मतदार संघातील गणिते बदलली असून, त्याचा फायदा राष्ट्रवादीला होण्याची शक्यता अधिक आहे. अर्थात त्यासाठी राष्ट्रवादीतील अंतर्गत वादही कमी होणे आवश्यक आहे. शिवसेना - भाजपची युती तुटली. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीही तुटली. या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे सर्व उमेदवारांचा कस लागणार आहे. सुरुवातीच्या काळात शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांचे पारडे जड होते. परंतु, बदलत्या काळानुसार राष्ट्रवादीचे उमेदवार व जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्याबाबत मतदारांमध्ये सहानुभूती वाढत आहे. भारतीय जनता पक्षाचे माधव गवळी हेही तगडे उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाचे मतदार आपल्या उमेदवारापेक्षा कमळ या निशाणीकडे पाहून मतदान करणार आहेत. त्यामुळे माधव गवळी यांचीही ताकद वाढत आहे. याशिवाय काँग्रेसच्या रश्मी कदम, रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन सेना, बसपा व अपक्ष उमेदवार आपापल्या परीने मते ओढून घेणार आहेत. आज तरी मतदार संघातील मुख्य लढत ही राष्ट्रवादी व शिवसेना अशीच आहे. तिसऱ्या स्थानावर भाजपा आहे. चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची संमिश्र ताकद आहे. संगमेश्वर तालुक्यात शिवसेनेचे पारडे जड आहे. येथे भाजपालाही मानणारा मोठा वर्ग आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा विचार करता येथील लढत ही तुल्यबळ होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी यांच्याबरोबरच भारतीय जनता पक्षानेही मुसंडी मारली आहे. भाजपाचा उमेदवार शिवसेनेसाठी उपद्रवी ठरणार आहे. शिवाय या मतदार संघात शिवसेनेमध्ये असलेली अंतर्गत नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसेनेचे अनेक प्रमुख कार्यकर्ते प्रचारापासून लांब आहेत. कुणबी समाजाची मतेही राष्ट्रवादीकडे वळत असल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसणार आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांचे संगमेश्वर तालुक्यात सर्व पक्षातील कार्यकर्त्यांशी मित्रत्त्वाचे संबंध आहेत. शिवाय अनेक कामांच्या माध्यमातून त्यांचा थेट संबंध येतो. त्यामुळे निकम यांच्याबाबत मतदार संघात आपुलकीचे नाते आहे. याचा फायदा उमेदवार म्हणून निकम यांना होण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा आहे.शिवसेनेमधील अनेक पदाधिकारी नाराज असून, त्यांनी प्रचारापासून दूर राहणे पसंत केले आहे. भाजपाचे उमेदवार माधव गवळी हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्याही भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे नाराज शिवसैनिक भाजपकडे सरकण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या रश्मी कदम यांना काँग्रेसचे पारंपरिक मतदान होईल. परंतु, काँग्रेसला मानणारे तरुण कार्यकर्तेही राष्ट्रवादीला मतदान करतील. त्यामुळे एकूणच या मतदार संघात हळूहळू राष्ट्रवादीचे बळ वाढू लागले आहे. आजघडीला तरी या मतदार संघात विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांना विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. $$्रिफोटो 01 सदानंद चव्हाण, 01 शेखर निकम व 01 माधव गवळीचिपळूण --एकूण मतदार २,४९,६८८नावपक्ष- रश्मी कदमकाँग्रेससदानंद चव्हाणशिवसेना----सुशांत जाधवरिपाइं प्रेमदास गमरेबसपा---माधव गवळीभाजपयशवंत तांबेरिपाइं--गोपीनाथ झेपलेअपक्षउमेश पवारबहुजन मु. पार्टी--संतोष गुरवअपक्ष--शेखर निकमराष्ट्रवादी