शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

आपल्या नावावर एकतरी आमदार निवडून आणा

By admin | Published: October 25, 2015 10:51 PM

नीलेश राणे : मंडणगड नगरपंचायत प्रचारसभेत रामदास कदमांना आव्हान

मंडणगड : स्वत:ला कोकणचे नेते म्हणून संबोधणाऱ्या पर्यावरणमंत्र्यांनी हिंमत असल्यास आपल्या नावाने एखादा तरी आमदार निवडून आणावा, नंतरच आक्रमकतेच्या पोकळ गमजा माराव्यात, अशा शब्दांत काँग्रसचे युवा नेते नीलेश राणे यांनी रामदास कदमांवर टीका केली.मंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेसाठी राणे मंडणगड येथे आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. ज्यांची राणेंशी नजर मिळवण्याची ताकद नाही, ते आमच्याशी काय लढणार? याउलट राणेंनी मातोश्रीच्या अंगणात निवडणूक लढवून दाखवली आहे. रामदास कदम यांची तोतरी आक्रमकता पोकळ असून, त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवण्याची गरज नाही, असे राणे म्हणाले.कोकणातील जनतेच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. राज्यात सत्तेसाठी भाजपची भांडी घासण्याचे काम शिवसेना करीत आहे. हिंमत असेल तर वेगळी चूल मांडत सत्तेतून बाहेर पडा, असे आव्हान त्यांनी दिले. पंचवीस वर्षे लोकांकडून पान व तंबाखू खाऊन लोकांनाच चुना लावला. सडलेल्या दातांप्रमाणे जनतेला सडलेले रस्ते आंदणात दिल्यानेच जनतेने शेवटी त्यांच्या कंबरेत लाथ घातली आहे, असे राणे म्हणाले.आमदार संजय कदम यांनी निवडणुकांनिमित्त शहरात यशस्वी केलेल्या महाआघाआडीच्या प्रयोगांचे विशेष कौतुक करताना आमदारांनी केलेला प्रयोग कोकणासह राज्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचे ते म्हणाले. यावेळी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते माजी आमदार भाई जगताप, आमदार संजय कदम, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय भोसले, राष्ट्रवादी दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, काँग्रसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुलतान मुकादम, रिपाइं तालुका कार्याध्यक्ष सुभाष तांबे, सिध्दार्थ कासारे, दादासाहेब मर्चंडे, जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे, चिपळूण उपनराध्यक्ष लियाकत शहा, काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष सावंत, रमेश दळवी, संतोष मांढरे, गणेश रुखे, समद मांडलेकर, संदेश चिले, कादीर बुरोंडकर, राजा लेंढे, विनीत रेगे, अशोक कोकाटे व रघुनाथ देवरुखकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)बाळासाहेब आमचे दैवतच : राणेशिवसेनाप्रमुख बाळासाहेब आजही आमचे दैवत आहेत. मात्र, उद्घव ठाकरेंनी पैशांसाठी आमदार व खासदारकीची तिकिटे विकली आता खांदे पाडून शिवसेनेची ताकद संपवून टाकली. शिवाजी महाराज व भगव्याच्या नावावर भावनिक भाषणे करुन जनतेची माथी भडकवण्याचा शिवसेनेचा धंदा जुना असल्याचे ते म्हणाले.