शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

धनगर समाजाला हक्काची घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2015 11:37 PM

समाजासाठी आदर्श : संतोषकुमार दळवींनी घेतला पुढाकार

कसई दोडामार्ग : तालुक्यातील धनगर समाजातील ग्रामस्थांना स्वत:च्या मालकीची जमीन नसल्याने त्यांना स्वत:चे हक्काचे घर मिळत नाही. कोणी जागा देतील तेथे राहतात. हा समाज अद्याप मागास आहे. धनगर वस्तीमध्ये लाईट, पाणी आदी सुविधांची वानवाच आहे. शासनानेही पाठ फिरविल्याने एकाकी पडलेल्या धनगर वस्तीसाठी दोडामार्ग येथील सामाजिक कार्यकर्ते संतोषकुमार दळवी वरदान ठरले आहेत. पदरमोड करून धनगर समाजाला त्यांनी हक्काची घरे बांधून दिली. ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. याचा आदर्श इतर दानशूर व्यक्तींनी घेतल्यास समाजात कुणीही हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही. भटक्या जमातीतील घोटगेवाडीतील धनगर समाजातील तुकाराम लक्ष्मण जंगले यांच्यासमोर हक्काच्या घराची विवंचना होती. त्यांनी आपले अर्धेअधिक आयुष्य केमळ्याच्या झोपडीत काढले. अखेर नियतीला जाग आली असावी, म्हणनूच दोडामार्गातील सामाजिक कार्यकर्ते संतोषकुमार दळवी यांनी त्यांना हक्काचे घर बांधून दिले. त्यामुळे जंगले यांनी दळवी यांचे आभार मानले. ही गोष्ट येथेच थांबली नाही. जंगले कुटुंब गेली कित्येक वर्षे घोडगेवाडी धनगरवाडीत राहत होते. ना रेशनकार्ड, ना जमीन. यामुळे शासनाच्या विविध योजनांपासून हे कुटुंब वंचित होते. त्यांच्याकडे काही शेळ्या होत्या. त्याही झोपडीच्या बाजूलाच बांधत असल्याने याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर झाला. जंगले यांच्या पत्नीला क्षयरोगाची लागण झाली. अशा बिकट परिस्थितीत जगत असताना देवाच्या रुपात त्यांच्या मदतीला धावले संतोषकुमार दळवी! बेघराला मिळाले घरकुलदोडामार्गचे सामाजिक कार्यकर्ते व घोडगे गावचे सुपुत्र संतोषकुमार दळवी यांना जंगले कुटुंबाची हलाखीची परिस्थिती समजताच त्यांनी जंगले यांची भेट घेतली. त्यांची हलाखीची परिस्थिती पाहून लगेच शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली व घरकुल योजनेतून घर बांधून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु लाभार्थ्याची जमीन, रेशनकार्ड, दारिद्र्यरेषेखाली नाव नाही, असे अनेक प्रश्न समोर आले. दळवी यांनी २००८ मध्ये शासनाकडे अर्ज सादर करून जंगले यांचे नाव दारिद्र्यरेषेखाली घालावे, असे सांगितले होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांने त्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या. दळवी यांनी याच्यातूनही मार्ग काढत घर बांधण्यासाठी येणारा खर्च काढला. जंगले यांनी बारा हजार रुपये जमा केले. उर्वरित ६० हजार रुपयांची रक्कम दळवी यांनी स्वत: घालून घर पूर्ण केले. जंगले यांना हक्काचे घर मिळाले. गृहप्रवेशाचा कार्यक्रम करून जंगले यांनी घरातही प्रवेश केला. या कार्यक्रमास संतोषकुमार दळवी यांच्यासह गणपत देसाई, संदीप नाईक, संजय मणेरीकर आदी उपस्थित होते. जंगले यांच्या घराच्या परिसरात संतोषकुमार दळवी यांनी नारळाची झाडेही लावली. (प्रतिनिधी) पाच कुटुंबांना दिला आधारदळवींवर कौतुकाचा वर्षावस्वत:ची जमीन नसलेल्या, घर बांधण्याची आर्थिक आणि मानसिकही क्षमता नसलेल्या एका बेघराला संतोषकुमार दळवी यांनी स्वप्रयत्नातून आणि स्वखर्चातून घर बांधून दिले. त्यांच्या या कार्याचे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.दुप्पट आनंद मिळतोआपल्या तालुक्यात अनेक दानशूर व्यक्ती आहेत. परंतु देण्याची, मदत करण्याची इच्छा प्रत्येकाची नसते. मी एका गरीब कुटुंबातच जन्माला आलो असल्यामुळे गरिबीतील दिवस कसे असतात, याची मला जाण आहे. माझ्यामुळे कोणाच्या जीवनात आनंदाचे दिवस येत असतील, तर मी ते काम प्राधान्याने करीन. त्यांच्यापेक्षा दुप्पट आनंद आपल्याला मिळतो.- संतोषकुमार दळवी, सामाजिक कार्यकर्ते, दोडामार्ग. घोटगेवाडी -धनगरवाडी येथील चार कुटुंबांना दळवी यांनी घरे बांधून दिली असून, जंगले यांचे हे पाचवे घर आहे.ही पाचही कुटुंबे आज दळवी यांच्या मदतीमुळे आनंदाचे जीवन जगत आहेत. त्यांचे स्वत:च्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यांनी संतोषकुमार दळवी यांचे आभार मानले आहेत.