सिंधुदुर्गनगरी : शासन करोडोंनी रुपये खर्च करून राज्याच्या ग्रामीण भागात होऊ शकत नसलेली स्वच्छता व त्या अनुषंगाने प्रबोधन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात झाली. त्यामुळे विद्यमान सरकारने मागील सरकारचा उपक्रम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, संत गाडगेबाबा ऐवजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता असे या अभियानाला नाव देण्यात आले आहे.
१ मे २०१८ पासून याची अंमलबजावणी सुरू होणार असून राज्यस्तरीय निकाल जाहीर करून २ आॅक्टोबर २०१९ रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. मागील स्पर्धेप्रमाणे जिल्हा परिषद गटापासूनचे फक्त तालुकास्तर वगळता स्पर्धेचे सर्व टप्पे कायम ठेवण्यात आले असून त्यापूर्वी ग्रामपंचायत स्तरावर प्रभाग हा टप्पा वाढविण्यात आला आहे.राज्यात ग्रामीण स्वच्छतेची व्याप्ती वाढावी, स्वच्छतेचे महत्त्व अधिक परिणामकारक ठरून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत याचे महत्त्व पोहोचावे यासाठी हे अभियान नवीन दमात आणण्यात आले आहे.वैयक्तिक स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मासिक पाळी व्यवस्थापन, पाणीपुरवठा व परिसर स्वच्छता या प्रमुख विषयांना यात प्राधान्य देण्यात आले आहे. १ ते १५ मे या कालावधीत राज्यस्तरावर पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री यांच्या स्तरावर राज्यस्तरीय बैठक तर जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी तालुकास्तरावर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच सभापती-उपसभापती, आमदार व खासदार यांची बैठक घेऊन याबाबत माहिती देणार आहेत.पंचायत समिती, जिल्हा परिषदेसाठी स्पर्धाराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने स्वच्छ पंचायत समिती व जिल्हा परिषद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी यांनी पंचायत समितीच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींना मिळालेल्या एकूण गुणांची बेरीज करून एकूण गुणांच्या ३५ टक्के गुण विचारात घेऊन त्यास एकूण ग्रामपंचायत संख्येने भागायचे. जे गुण येतील ते जिल्हा परिषदेजवळ सादर करावयाचे आहेत. राज्यात सर्वात जास्त गुण असणाºया पंचायत समित्यांना प्रथम तीन क्रमांक दिले जाणार आहेत. ५० लाख, ३० लाख व २० लाख असे अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाना बक्षीस असणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात प्रथम येणाºया जिल्हा परिषदेला एक कोटी, द्वितीय ७५ लाख व तृतीय ५० लाख असे बक्षीस देण्यात येणार आहे.प्रत्येक स्तरावर भरघोस बक्षीसेग्रामपंचायत पातळीवर उत्कृष्ट प्रभागासाठी १० हजार रुपये, जिल्हा परिषद गटासाठी ५० हजार रुपये, जिल्हास्तर प्रथम ५ लाख, द्वितीय ३ लाख व तृतीय २ लाख, विभाग दहा लाख, आठ लाख व सहा लाख असे प्रथम तीन येणाºया ग्रामपंचायतींनी तर राज्यस्तर प्रथम २५ लाख, द्वितीय २० लाख व तृतीय १५ लाख रूपये.