शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कुटुंबियांचे सावंतवाडीशी जवळचे नाते

By अनंत खं.जाधव | Published: November 09, 2022 11:20 PM

वडिलांचे शिक्षण सावंतवाडीत तर आजोबा राजघराण्याचे होते दिवाण

अनंत जाधव 

सावंतवाडी : भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर त्याचे सुपूत्र धन॔ंजय चंद्रचूड यांनी भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणू बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शपथ घेतली.आणि चंद्रचूड कुटुंबियांचे सावंतवाडीशी असलेले नात्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. वडिल यशवंत चंद्रचूड यांचे शिक्षण सावंतवाडीत झाले तर आजोबा राजघराण्याचे दिवाण म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते.तसेच चंद्रचूड कुटुंबियांनी सावंतवाडीतील अनेक कार्यक्रमात वेळोवेळी सहभागी होत असल्याचे सावंतवाडीकर सांगतात. धनंजय चंद्रचूड यांनी बुधवारी सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती दैपद्री मुर्म याच्या कडून शपथ घेतली त्यानंतर चंद्रचूड कुटुंबियांच्या सावंतवाडी विषयी अनेक आठवणींना उजाळा दिला सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी ही चंद्रचूड यांचे सावंतवाडीशी जवळचे नाते असल्याचे सांगितले वडील यशवंत चंद्रचूड हेही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. आता त्यांच्या सुपुत्राने सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.त्यामुळे चंद्रचूड यांची दुसरी पिढी ही सर्वाच्चपदी विराजमान झाली असे मसुरकर म्हणाले.

चंद्रचूड हे तसे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील करसेनर गावचे रहिवासी आहेत. मात्र चंद्रचूड घराण्याची नाळ पूर्वीपासून सावंतवाडीशी जोडली गेलेली आहे.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे आजोबा विष्णू चंद्रचूड हे सावंतवाडी संस्थांनात दिवाण होते.त्या काळात माजी सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांचे काहि शिक्षण सावंतवाडीत झाले. त्यानंतर हे घराणे मुंबईत गेले. पुढे विष्णू चंद्रचूड यांचे पुत्र यशवंत चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले. सर्वाधिक काळ सरन्यायाधीश म्हणून ते कार्यरत राहिले. 1978 ते 1985 या काळात ते  सरन्यायाधीश होते त्यांच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यावर निकाल लागले. सावंतवाडी संस्थानचे राजे शिवरामराजे भोसले यांनी यशवंत चंद्रचूड यांचा सत्कारही केला होता. त्यानंतर राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला धनंजय चंद्रचूड यांनी हजेरी लावली होती. सावंतवाडी संस्थानाशी चंद्रचूड घराण्याने कायम नाळ ठेवली होती. तीन पिढ्या ते सावंतवाडी संस्थानशी नाळ ठेवून होते. पूर्वी संस्थानात राजांच्या अनुपस्थितीत दिवाण हे न्याय निवाड्याचे करीत असत. धनंजय चंद्रचूड यांचे आजोबा सावंतवाडी संस्थानात दिवाण होते. पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र यशवंत चंद्रचूड न्यायाधीश बनले. तीच परंपरा धनंजय चंद्रचूड यांनी पुढे चालू ठेवली. आता ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले आहेत. 

धनंजय चंद्रचूड हे ही अनेक वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेले मात्र त्यांनी मोठ्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला नव्हता.पण आता सरन्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड यांची नेमणूक झाल्यानंतर चंद्रचूड कुटुंबियांच्या अनेक आठवणीना सावंतवाडी करानी उजाळा दिला.

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयSawantwadiसावंतवाडी