कणकवली : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मुलगा आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे.त्यांचा नातू मंत्री आहे अशा वेळी राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन करावे लागते ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.सरकारचे डोके खरच ठिकाणावर आहे काय ? हा प्रश्न भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आम्ही विचारत आहोत.मटका , झुगार , बियर बार हे सर्व चालू आणि मंदिरे , वाचनालये , बंद आहेत. त्यामुळे हे नशा करणाऱ्या लोकांचे सरकार आहे काय ? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी उपस्थित केला.राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी ठाकरे सरकार विरोधात कणकवली प्रांताधिकारी कार्यालया समोर भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते . ते म्हणाले , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात गेल्या राज्याची पूर्ण लाज घालविली आहे.कोरोनात यांच्या आपयशामुळे राज्य एक नंबर वर आले. मंदिर उघडण्यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागते . यापेक्षा मोठे अपयश नाही . सरकारला थोडी जर लाज असेल तर ते मंदिरे उघडतील.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका , झुगार , दारू सर्व चालू आहे.काही शिवसेनेची मंडळीच मटका , झुगार रात्रभर बसून खेळतात. मात्र , त्यांना काही बंधन नाही.कोण त्यांना रोखत नाही . मात्र , मंदिर उघडण्यास मात्र बंदी आहे.आम्ही मंदिरात जाऊन आरती केली तर सर्वांवर गुन्हे दाखल केले जातील.राज्यातले तरुण मंत्री पार्ट्या करतात , त्यामुळे हत्या होतात , महिलांवर अत्याचार होतात . त्यावर कोणताही अंकुश नाही . मात्र , मंदिरे उघडली जात नाहीत. ग्रंथालये बंद आहेत. ज्याच्या मुळे देशाला आणि राज्याला आकार मिळतो , लोकांना आशीर्वाद आणि दिशा मिळते त्या गोष्टी करण्यास सरकार बंदी घालत आहे . मंदिरांवर अवलंबून असणाऱ्या छोट्या, मोठ्या व्यापाऱ्यांची उपासमार होत आहे.कोकणात भजनी बुवा , दशावतारी कलाकार यांनी अशा वेळी काय करावे ? त्यांनी बियर बारकडे बघत बसावे काय ? हे बाळासाहेबांना कधीही पटल नसते.घराच्या बाहेर पडणाऱ्या लोकांना हे मुख्यमंत्री इशारा देतात. पण आपण घराच्या चौकटीच्या बाहेर पडत नाहीत . त्यांना कसला इशारा देणार ? ते इशारा देण्याच्या तरी लायकीचे आहेत काय ? असा सवाल यावेळी आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना केला .यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली , भाजपा आध्यत्मिक समन्वय आघाडी कोकण विभाग सहसंघटक प्रकाश पारकर , जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत , कणकवली मंडल अध्यक्ष संतोष कानडे , राजन चिके , कणकवली सभापती दिलीप तळेकर , प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण आदी यावेळी उपस्थीत होते.
राज्यातील मंदिरे बंद ही तर शोकांतिका : नितेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 5:01 PM
nitesh rane, sindhudurg, temple हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मुलगा आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे.त्यांचा नातू मंत्री आहे अशा वेळी राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन करावे लागते ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.सरकारचे डोके खरच ठिकाणावर आहे काय ? हा प्रश्न भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आम्ही विचारत आहोत.मटका , झुगार , बियर बार हे सर्व चालू आणि मंदिरे , वाचनालये , बंद आहेत. त्यामुळे हे नशा करणाऱ्या लोकांचे सरकार आहे काय ? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी उपस्थित केला.
ठळक मुद्देराज्यातील मंदिरे बंद ही तर शोकांतिका !नितेश राणे यांची ठाकरे सरकारवर टीका