जगदीश कोष्टी -सातारा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन दरवर्षी सरासरी ७ जूनला होते. यंदा मात्र १२ जून उजडला तरी म्हणावा असा पाऊस पडला नाही. त्यामुळे अनेकांना चिंता सतावत असली तरी जिल्ह्यातील जलसाठे समाधानकारक आहेत. सर्वच धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाणी आहे. कोयना धरणात ३०.४५ टीएमसी पाणी असून, गेल्या वर्षी याच दिवशी अवघा १५.४७ टीएमसी होते.सातारा जिल्ह्याला लाभलेल्या नैसर्गिक वरदानामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. त्यामुळे महाबळेश्वर, वाई, सातारा, जावळी, पाटण तालुके हे अती पावसाचे म्हणून ओळखले जातात. या तालुक्यातही यंदा फारसा पाऊस झालेला नाही. या पाच जिल्ह्यांच्या अगदी उलटस्थिती असलेल्या माण, खटाव, फलटण व खंडाळा तालुक्यांचा काही भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या भागात नेहमी परतीचा पाऊस पडतो. मात्र, यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच या दुष्काळी तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे यंदा पावसाचे कसे होणार हा प्रश्न बळीराजापुढे उभा आहे.जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचा थेंबन्थेंब अडविण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रकल्प उभारले गेले. त्यामुळे मुबलक प्रमाणावर पाणीसाठा होत असल्याने जिल्ह्याबरोबरच शेजारच्या जिल्ह्याचीही तहान सातारा भागवत आहे. या सर्वच धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणीसाठे आहेत. कण्हेर आणि तारळी धरणाचा याला अपवाद आहे. जिल्ह्यातील धरणे व त्यात असलेले पाणी टीएमसीमध्ये (कंसात गेल्या वर्षी १२ जून रोजी) असा : कोयना ३०.४५ (१५.४७), धोम ३.५० (३.३९), कण्हेर २.८५ (३.२८), धोम-बलकवडी ०.३४ (०.३३), उरमोडी ६.७१ (५.१३), तारळे २.४८ (४.१०), येरळवाडी ०.५९ (०.३२), मोरणा ०.६७ (०.१८), उत्तरमांड ०.३९ (०.३७), नागेवाडी ०.१५ (०.१४), महू ०.०५ (०.०४), हातगेघर (०.०३१) (०.०११).तालुकानिहाय पाऊस (मिमी)तालुका२०१५२०१४सातारा ३३.९३९.०७जावळी२८.२३०.७पाटण४५.४५२.६कराड४५.२५५.६कोेरेगाव३१.४३८.८खटाव६४.८५६.०माण९७.७२८.४फलटण४४.०३४.५खंडाळा५६.०३८.६वाई१५.६२१.७महाबळेश्वर६७.८४.३एकूण५३०४००.९पाऊसही नाही मागेजिल्ह्यात सध्या पांढरा कापूस पिंजून ठेवल्यासारखे पांढरे ढग येत आहेत. काळे ढग संध्याकाळी जमा होतात अन् निघूनही जातात. त्यामुळे अनेकांच्या नजरा वरुणराजाकडे लागल्या असल्या तरी चिंतेचे कारण नाही, असे आकडेवारी सांगतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेला पाऊसही चांगलाच झाला आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत ५३० मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी या दिवसाअखेर अवघा ४००.९ मिलीमीटर झाला होता.
कोयनेत अजूनही २९ टक्के पाणीसाठा..!
By admin | Published: June 12, 2015 10:25 PM