देवगड : देवगड हापुस आंब्याचे उत्पादन मर्यादित असताना सुध्दा यावर्षी मात्र सातत्याने आंबा कॅनिंग कंपन्या कॅनिंग आंब्याचा दर सातत्याने घटवुन सध्या 16 रुपये प्रति किलोवरती आणुन ठेवला आहे.
लाखोरुपयाची फवारणी करुनही आज बागायतदारांना कॅनिंग कंपन्यांच्या पिळवणुकिमुळे कवडीमोलाने म्हणजेच 16 रुपये प्रतिकिलो भावाने आंबा कॅनिंगला दयावा लागत आहे. याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने व लोकप्रतिनिधींनी आवाज उठवुन बागायतदारांना न्याय मिळवून देउन किमान 30 रुपये प्रतिकिलो कॅनिंगचा दर राहिला पाहिजे.देवगड हापूसचे यावर्षी उत्पन्न सुमारे 40 टक्के असल्याचे बोलले जात आहे.फेब्रुवारी महिन्यामध्ये देवगड हापुसचा हंगाम सुरु झाला.फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये 10 टक्के व एप्रिल महिन्यामध्ये 10 टक्के व मे महिन्यामध्ये 20 टक्के असे देवगड हापूसचे उत्पन्न यावषीर्चे असून यावर्षीच्या एकुण उत्पन्नपैकी 50 टक्के उत्पन्न हे 5 मे ते 25 मे दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे .
शेवटच्या टप्यातील सध्या देवगड हापूसची झाडावरची तोडणी आंब्याची केली जात असून येत्या 4 ते 5 दिवसामध्ये यावर्षी देवगड हापूस आंब्याचा हंगाम संपणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर्षी कॅनिंग कंपन्यांनी 1 मे पासून कॅनिंग आंबा घेण्यास व कॅनिंगचा व्यवसायाला सुरुवात केली होती.
सुरुवातीला कॅनिंगचा दर 29 रुपये प्रतिकिलो होता. या कॅनिंग आंबा घेणा-या कंपन्यांवरती कुणाचेही बंधन नसल्याने या कंपन्यांनी कॅनिंगच्या दरामध्ये सातत्याने घट करुन सदया 16 रुपये प्रतिकिलोने कॅनिंगचा दर आणून ठेवला आहे.यामुळे या कॅनिंग कंपन्यांच्या दलालांकडून पुर्णपणे शेतक-यांची पिळवणुक केली जात आहे.
कॅनिंगचा दर हा स्थिर असणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हयामध्ये काहि ठिकाणी कॅनिंग सेंटर उभारुन 30 रुपये प्रतिकिलोने कॅनिंगचा दर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठेवण्यात आला होता. यामुळे इत्तर आंबा घेणा-या कॅनिंग कंपन्यांनाही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत गतवर्षी कॅनिंगचा दर 30 रुपये ठेवावा लागला होता.
यावर्षी मात्र सिंधुदूर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीने कॅनिंग सेंटर सुरु न केल्याने याच संधीचा फायदा सध्या कॅनिंग कंपन्यांच्या दलालांनी घेउन 16 रुपये प्रतिकिलोने सध्या कॅनिंगचा दर ठेवला आहे. यामुळे प्रतिकिलो 16 रुपयाने आंबा कॅनिंगला देवुन शेतकरी पुर्णपणे नुकसानीत आहे.
कारण बागायतदारांना कलमांना खत घालणे,त्यांची मशागत करणे वेळोवेळी किटकनाशक फवारणी करणे या सर्वांचा खर्च हा प्रचंड प्रमाणात येत असतो. कॅनिंगचा दर अल्प प्रमाणात यावर्षी असल्याने उत्पन्नपेक्षा खर्च जास्त अशी बागायतदारांची अवस्था नक्कीच होणार आहे.
यामुळे विदभार्तील शेतक-यांप्रमाणेच आत्महत्या करण्याची वेळ येवु नये यासाठी कृषी विभागाने आंबा कॅनिंगच्या दराबाबत ठोस उपाययोजना करुन कॅनिंगचा भाव 30 रुपये प्रति दराने स्थिर केला पाहिजे.आंबा कॅनिंगचा व्यवसाय सुरु झाल्यानंतर मुंबई-वाशी मार्केटमधील दलालही हापुस आंब्याच्या पेटीचा दर घसरवितात. कॅनिंगचा आंबा सुरु झाला कि, दरवर्षीच वाशी मार्केटमधील दलाल का हापुस आंब्याच्या पेटीचा दर का घसरवतात.हा देखील एक मोठा संशोधनाचा विषय आहे.कॅनिंगचा दर जसजसा कमी होत जातो तस तसा वाशी मार्केटमधीलही दलाल हापूस आंब्याच्या पेटीचा भाव कमी करुन अगदी दिडशे ते दोनशे रुपये डझनावरती आणला जातो. सध्या देवगड तालुक्यातील बहुतांश आंबा बागायतदारहे स्थानिक बाजारपेठेमध्ये स्वत:चा माल स्वत:च विकतात तर काही बागायतदार कोल्हापुर,पुणे,सांगली,सातारा,सोलापुर,मुंबई,ठाणे या ठिकाणी स्टॉल उभारुन देवगड हापुस आंब्याची विक्री चांगल्या भावाने करीत आहेत.
याठिकाणी त्यांना 200 रुपये डझन पासुन 400 रुपये डझनापर्यंत सध्या भाव मिळत आहे, असे असताना वाशी मार्केटमध्ये हापुसचा भाव का घसरला गेला व कॅनिंगचा दरही का सातत्याने कमी केला जातो, याकडे अभ्यासु वृत्तीने विचार करुन वाशी मार्केटमधील दलालांची मक्तेदारी व कॅनिंग कंपन्यांची हुकुमशाही हि मोडित काढली पाहिजे. तरच कुठेतरी देवगड हापुस आंब्याच्या बागायतदारांना न्याय मिळु शकतो.
विदर्भ मराठवाडयामधील तेथील शेतक-यांच्या पिकाला हमीभाव मिळण्यासाठी तेथील लोकप्रतिनिधी वेळोवेळी शेतक-यांच्या पाठीशी राहून आवाज उठवित असतात मात्र देवगड हापूस आंब्याच्या व्यापा-यांना कोणीही वालीच नसल्याने वाशी मार्केटमधील दलाल व कॅनिंग कंपन्यांचे दलाल मोकाट सुटले आहेत.
सध्या देवगड तालुक्यामधील सुमारे पंधरा दिवसामध्ये पाच हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त आंबा कॅनिंगला घालण्यात आला आहे.यामुळे यावर्षीच्या शेवटच्या टप्यातील हापूस आंबा हा एकुण उत्पन्नपैकी 50 टक्के असल्याने बागायतदारांची आंबा काडणी करतेवेळी धांदल उडाली होती.शेवटच्या टप्यातील आंबा हा संपुर्ण एकाएकी तयार झाल्याने काही बागायतदारांच्या बागेमध्ये आंबा पिकुन घळ होत होती.असे होत असतानाच बागायतदारांनी दिवस दिवसभर आंबा तोडणी करुन जास्त प्रमाणात आंबा कॅनिंगला घालत होते.
कॅनिंगला घालण्याचे प्रमाण बागायतदारांचे वाढल्यामुळे कॅनिंग कंपन्यांची या संधीचा फायदा घेउन कॅनिंगचे दर 29 रुपयांवरती असणारे 16 रुपये प्रति किलो आणुन ठेवले आहेत. हि एक बागायतदारांची लुटमारच केली जात आहे.
अवकाळी पाऊ स सातत्याने हवामानात होणारा बदल यामुळे बागायतदारांचे नुकसान होत असतानाच कॅनिंगचा दर कमी असल्यामुळे आता बागायतदारांना मोठया नुकसानीलाच सामोरे जावे लागत आहे.आंबा कंपनी आपल्या फायदयासाठी शेतक-यांना लुबाडत आहेत.
याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने व लोकप्रतिनिधींनी आतातरी बागायतदारांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या समस्या जाणुन त्याचे निवारण करण्यासाठी पुढे आले पाहिजेत.तरच देवगडच्या बागायतदारांना न्याय मिळावा अन्यथा विदभार्तील शेतक-यांप्रमाणे कोकणातील आंबा बागायतदारांची अवस्था होता नये याची तरी किमान दखल घेतली पाहिजे.