कसई दोडामार्ग : कोलझर ते शिरवल, कुंब्रल ते कुडासे हा जिल्हा परिषद रस्ता पूर्णपणे वाहतुकीस खराब झाल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असताना जिल्हा परिषद बांधकाम खात्याने या मुख्य रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमधून व वाहनचालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्ता त्वरित दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. बांदा ते कुडासे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र, हा रस्ता गेली १० वर्षे पूर्णपणे खराब झाला आहे. रस्त्यावरून वाहतूक करणे म्हणजे अपघातास निमंत्रण देण्यासारखी परिस्थिती आहे. गेल्यावर्षी पाठपुरावा करून अखेर मोरगाव ते तळकटपर्यंत रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याने या रस्त्याचे आमदार दीपक केसरकरांनी डांबरीकरण केले होते. उर्वरित कोलझर ते शिरवल व कुंब्रल ते कुडासे, पडवे माजगाव ते मोरगाव या रस्त्यावरील डांबराचा अंश नाहीसा होऊन रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे रुग्ण, वृद्ध व्यक्तींसह सर्वांनाच याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर अनेक छोटेमोठे अपघात झाले असून बांधकाम विभाग निद्राधीन आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेकडे निधी नसल्याने आमदार केसरकरांनी यात गांभीर्याने लक्ष घालून रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे. कोलझर येथील धोकादायक पुलाजवळील मुख्य वळणावरच भलामोठा खड्डा पडला आहे. समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने वाहने खड्ड्यात किंवा नदीपात्रात कोसळण्याची भीती आहे. अशीच परिस्थिती शिरवल पुलाजवळ आहे. एवढी भयानक परिस्थिती पुलाची होऊनही जिल्हा परिषद निधी नसल्याचे सांगून हात वर करीत आहे. या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वाहनचालक व ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)सर्व मोऱ्या खचलेल्या सर्व मोऱ्या खचलेल्या कुंब्रल ते पणतुर्ली, कुडासे मणेरी तिठा या दरम्यानच्या सर्व मोऱ्या खचलेल्या आहेत. कोलझर ते शिरवल व कुंब्रल ते कुडासे, पडवे माजगाव ते मोरगाव या जिल्हा परिषदेच्या रस्त्याचे काम निधीअभावी शिल्लक आहे. यापूर्वी केलेल्य कामाच्या डांबरी अंश पूर्णपणे नाहीसा होऊन रस्ता खड्डेमय झाला आहे.
कोलझर रस्ता धोकादायक
By admin | Published: December 14, 2014 8:06 PM