कणकवली : कणकवली शहराच्या विकासाच्या दृष्टीने रस्ते, वीज तसेच उद्यान अशा कामांचा शुभारंभ नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. कणकवलीच्या विकासासाठी नगरपंचायत कटिबद्ध असून नागरिकांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाचे हे फलित आहे. विकासासाठी सर्व नगरसेवक एकत्र असून यासाठी कणकवलीतील नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.कणकवली नाथ पै नगर पश्चिम येथील म्हाडेश्वर रुग्णालय ते राणे घर जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण, रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामाचा शुभारंभ उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. नगरोत्थान निधीतून हे काम हाती घेण्यात आले आहे.यावेळी नगरसेवक संजय कामतेकर, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, अण्णा कोदे, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, मानसी मुंज, किशोर राणे, ज्येष्ठ नागरिक राजाराम परब, संदीप राणे, ॲड. संदीप राणे, सुभाष राणे, अनिल परब, मनोहर पालयेकर, चेतन मुंज, योगेश मुंज, प्रांजल चव्हाण आदी नागरिक उपस्थित होते.यावेळी मनोहर पालयेकर म्हणाले, गेली २ वर्षे या रस्त्याचे काम रखडलेले होते. नगरपंचायतीकडे पाठपुरावा करून आज या कामाला खऱ्या अर्थाने मुहूर्त मिळाल्याने हे काम मार्गी लागत आहे. यासोबतच आता थ्रीफेज लाईन नसल्याने कमी भारमानामुळे घरातील विद्युत उपकरणे जळून जात आहेत. यामुळे थ्रीफेज विद्युत वाहिनी येथे टाकून मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.नगराध्यक्ष समीर नलावडेंचा सत्कारयावेळी मनोहर पालयेकर म्हणाले, येथील नागरिकांना सायंकाळच्या वेळेत बसण्यासाठी बाकडी उपलब्ध करून द्यावीत. नगरपंचायतीकडून नागरिकांना कायमच सहकार्य मिळत असल्याचे सांगत त्यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना नलावडे यांनी नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
नाथ पै नगर येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 12:45 PM
Kankavli, RoadSefty, Sindhudurg कणकवली नाथ पै नगर पश्चिम येथील म्हाडेश्वर रुग्णालय ते राणे घर जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण, रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामाचा शुभारंभ उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. नगरोत्थान निधीतून हे काम हाती घेण्यात आले आहे.
ठळक मुद्देनाथ पै नगर येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभकणकवलीच्या विकासासाठी कटिबद्ध : समीर नलावडे