शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सामाजिक उपक्रमांची बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2015 11:14 PM

चितारआळीचा राजा : दरवर्षी वेगवेगळे देखावे

प्रसन्न राणे -सावंतवाडी -जिल्हावासीयाचे आकर्षक ठरणाऱ्या चितारआळीच्या राजाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. फक्त गणेशोत्सव म्हणून साजरा न करता या मंडळाने मिळालेल्या निधीतून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन देखावे सादर करीत आहेत.रौप्य महोत्सवी चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आकर्षक अशा जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध उपक्रम हे मंडळ राबवित असते. तसेच दरवर्षी अत्यंत एकापेक्षा एक असे देखावे उभारून त्यातून समाजप्रबोधन करण्याचे काम गेली २५ वर्षे मंडळ करीत आहे. तर आजही अतिउत्साहात ही कला जपली जाताना दिसत आहे. चितारआळी येथे १९९० पासून गणेशोत्सव साजरा केला जातो. रंगमंचाच्या उभारणीपासून विसर्जनापर्यंत सारे काही शिस्तबद्ध आणि आखीव-रेखीव पद्धतीने साजरे होते. येथील सर्व रहिवाशांना, त्यांच्या कुटुंबियांना एकत्र येता यावे, या उद्देशाने या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९९१ मध्ये गुरूनाथ वेर्णेकर, विकास नागुळकर, कुशाल सुराणा, प्रकाश पोतनिस, गजानन चितारी, दिलीप वाडकर आदींनी एकत्र येऊन केली. चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पहिल्या काही वर्षात बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गरज म्हणजे मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी लागणारा भव्य सभामंडप उभारणीसाठी वसंतराव केसरकर यांनी पुढाकार घेतला आणि सभा मंडपाची उपलब्धता झाली. सभामंडपाचा प्रश्न सुटल्याने अन्य साधनसामग्रीसाठी स्थानिकांचेही हात सरसावले. सर्वांच्या सहकार्यातून आवश्यक ती साधनसामग्री जमा झाली आणि ‘चितारआळीचा राजा’ ची प्रतिष्ठापना झाली.मूर्ती पूजनाबरोबर देखाव्यांची परंपरा जपणाऱ्या या मंडळाने यंदा उत्सवाच्या ठिकाणी पौराणिक, आकर्षक असे चलचित्र देखावे सादर केले आहेत. विठ्ठल दर्शन, संत गोरा कुंभार या पौराणिक विषयांवर हालता देखावा तयार केला. हे देखावे पाहण्यासाठी, कर्नाटक, गोवा तसेच जिल्हाभरातूनही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यंदा हे देखावे कलाकार नाना नरसाळे आणि मंगेश धारगळकर यांनी साकारले आहेत. मंडळाचे अध्यक्ष सुरेश भोगटे, उपाध्यक्ष बाबल वाडकर व मंडळाचे कार्यकर्ते दरवर्षी हा उत्सव दिमाखात साजरा करण्यासाठी परिश्रम घेतात. विसर्जनादिवशी चितारआळीच्या राजाची संपूर्ण शहरातून वाजत-गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत आणि नामगजरात मिरवणूक काढली जाते. येथील मोती तलावात गणरायाचे श्रद्धापूर्वक विसर्जन केले जाते. रौप्य महोत्सवात पदार्पणभक्तगणांच्या हाकेला धावून अनेक अडीअडचणी सोडवून चितारआळीच्या राजाने यंदा रौप्य महोत्सवात पदार्पण केले आहे. त्यामुळे भक्तगणांच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा अशी ख्याती या चितारआळीच्या राजाची निर्माण झाली आहे.