वैभववाडी : वैभववाडी तालुकास्तरीय बाल कला-क्रीडा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद भुईबावडा प्रभागाने पटकावले. क्रीडा महोत्सवाचे पारितोषिक वितरण पंचायत समिती सदस्य नासीर काझी, शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद शिनगारे, आदींच्या हस्ते करण्यात आले.नानिवडे येथील सरस्वती विद्यामंदिर प्रशालेच्या पटांगणावर तालुकास्तरीय बाल कला-क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव उत्साहात पार पडला. याचा निकाल पुढीलप्रमाणे-लहान गट (वैयक्तिक क्रीडा प्रकार) - मुले : ५० मीटर धावणे : प्रथम अमोल मोरे (भुईबावडा), द्वितीय मैनुद्दीन रमदूल (उंबर्डे). १०० मीटर धावणे : प्रथम अमोल मोरे (भुईबावडा), द्वितीय ऋतिक बागवे (कुर्ली नं. १). लांबउडी : प्रथम महेंद्र रायका (लोरे टेळेवाडी नारकरवाडी), द्वितीय राहुल पाटील (कुर्ली नं. १). उंचउडी : प्रथम आर्यन कातकर (नाधवडे ब्राह्मणदेव), द्वितीय राहुल पाटील (कुर्ली नं. १).मुली : ५० मीटर धावणे : प्रथम साक्षी लिंगायत (मांगवली नं.१), द्वितीय सलौनी पार्टे (नाधवडे सरदारवाडी). १०० मीटर धावणे : प्रथम साक्षी लिंगायत (मांगवली नं.१), द्वितीय करीना पाटील (कुर्ली नं. १). लांबउडी : प्रथम प्रणिता शेळके (नावळे धनगरवाडा), द्वितीय दिशा कोलते (वेंगसर नं.१). उंचउडी : प्रथम प्राची पवार (करुळ गावठण), द्वितीय स्नेहा यादव (केंद्रशाळा नाधवडे).लहान गट (सांघिक क्रीडा प्रकार) - मुले : कबड्डी : प्रथम कुर्ली नं.१ , द्वितीय तिरवडे तर्फे खारेपाटण. खो-खो : प्रथम केंद्रशाळा नाधवडे, द्वितीय नानिवडे वाडेकरवाडी. रिले ५० बाय ४ : प्रथम उंबर्डे उर्दू शाळा, द्वितीय नाधवडे ब्राह्मणदेव. मुली : कबड्डी : प्रथम जांभवडे नं. १, द्वितीय लोरे हेळेवाडी. खो-खो : प्रथम नाधवडे ब्राह्मणदेव, द्वितीय जांभवडे नं. १. रिले ५० बाय ४ : प्रथम कुर्ली नं. १, द्वितीय मांगवली शाळा. मुले व मुली : ज्ञानी मी होणार : प्रथम कुसूर बाणारवाडी, द्वितीय हेत नं. १ शाळा. समूहगान : प्रथम सोनाळी नं. १, द्वितीय मांगवली नं. १ शाळा. समूहनृत्य : प्रथम एस. डी. पेडणेकर लोरे, द्वितीय सोनाळी नं. १.मोठा गट (वैयक्तिक क्रीडा प्रकार) - मुले : १०० मीटर धावणे : प्रथम राहुल चाळके (अ. वि. मं. सोनाळी), द्वितीय अब्दुल ठाणगे (कोळपे उर्दू शाळा). २०० मीटर धावणे : प्रथम राहुल कोकरे (नावळे धनगरवाडा), द्वितीय रवींद्र कदम (गडमठ नं. १). लांबउडी : प्रथम अब्दुल ठाणगे (कोळपे उर्दू शाळा), द्वितीय तुषार बावडेकर (गडमठ नं. १). उंचउडी : प्रथम राहुल चाळके (अ.वि. सोनाळी), द्वितीय तुषार बावडेकर (गडमठ नं. १). गोळाफेक : प्रथम प्रज्योत हरयाण (अ.वि.मं. सोनाळी), द्वितीय राहुल कोकरे (नावळे धनगरवाडा).मुली : १०० मीटर धावणे : प्रथम श्रृती सुतार (सांगुळवाडी नं. १), द्वितीय वैष्णवी चव्हाण (अ.वि.मं. सोनाळी). २०० मीटर धावणे : प्रथम पूनम मठकर (गडमठ नं. १), द्वितीय स्नेहल मोरे (मौदे). लांबउडी : प्रथम श्रृती सुतार (सांगुळवाडी नं. १), द्वितीय स्नेहल मोरे (मौदे). उंचउडी : प्रथम निशा बणे (जांभवडे नं. १), द्वितीय सायली डांगे (हेत नं. १). गोळाफेक : प्रथम वैष्णवी चव्हाण (अ.वि.मं. सोनाळी), द्वितीय सायली तळेकर (गडमठ नं.१).मोठा गट (सांघिक क्रीडा प्रकार) - मुले : कबड्डी : प्रथम अ. वि. मं. इंग्लिश स्कूल सोनाळी, द्वितीय जांभवडे नं. १. खो-खो : प्रथम नानिवडे वाडेकरवाडी, द्वितीय लोरे हेळेवाडी. रिले १०० बाय ४ : प्रथम अ. वि. मं. सोनाळी, द्वितीय जांभवडे नं. १. मुली : कबड्डी : प्रथम गडमठ नं. १, द्वितीय जांभवडे नं. १. खो-खो : प्रथम नानिवडे वाडेकरवाडी, द्वितीय नाधवडे ब्राह्मणदेव. रिले १०० बाय ४ : प्रथम जांभवडे नं. १, द्वितीय गडमठ नं. १. मुले व मुली : ज्ञानी मी होणार : प्रथम नानिवडे वाडेकरवाडी, द्वितीय नाधवडे ब्राह्मणदेव. समूहगान : प्रथम सोनाळी नं. १, द्वितीय कुर्ली नं. १. समूहनृत्य : प्रथम कुर्ली नं. १, द्वितीय सोनाळी नं. १.
भुईबावडा प्रभागाला सर्वसाधारण विजेतेपद
By admin | Published: January 21, 2015 9:25 PM