शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

पश्चिमेची आंब्याशी स्पर्धा

By admin | Published: December 18, 2014 9:12 PM

फेरफटका...

कोकणात सध्या आंबा आणि पाण्याचा विषय गाजतो आहे. रत्नागिरी हापूसची अवीट गोडी व त्याला प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातून झालेली स्पर्धा हा कुतुहलाचा विषय ठरला आहे. दरवर्षी रत्नागिरीतून हापूसची स्वारी परदेशात जाते. यंदाही ही स्वारी रवाना होणार असली तरी यामध्ये आपली ओळख व्हावी, यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून प्रथमच स्पर्धा झाली. जुन्नरमधून हापूस तयार करुन त्याची चार डझनाची पेटी मुंबईमध्ये गेली. देवगड, रत्नागिरी या हापूसचा स्वाद जगाने प्रेम करावा असा आहे. मात्र, या व्यवसायात सध्या अघोरी स्पर्धा सुरू आहे.आंब्याच्या उलाढालीत कोकणच्या शेतकऱ्याचे अर्थकारण गुंतलेले असते. चार महिने या क्षेत्रात बागायतदार व्यावसायिकदृष्ट्या उतरलेले असतात, तर संपूर्ण वर्षभर बागायतीवर अवलंबून असलेले ग्रामीण भागातील छोटे-मोठे शेतकरी आपली वर्षाची निकड यातून काढण्याचा प्रयत्न करत असतात. कोकणात आंब्याचे उत्पादन हे देशभरातील इतर कोणत्याही राज्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळेच जगभरातून पर्यटक अथवा कोणताही परदेशी पाहुणा आला की, तो आंब्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहात नाही. सध्या या पिकामध्ये तंत्रज्ञानाची भर पडली आहे. कल्टारचा वापरही अधिक प्रमाणावर केला जातो. आंब्याची वाढ व आंब्याचे पीक या दोन्ही गोष्टी संबंधित बागायतदार शेतकरी जीवापाड जपत असतो. यातच अनेक बँकांचे सहकार्य या विषयाला घेतल्यामुळे त्याचा परतावा वेळेत कसा देता येईल, याचा विचारही महत्त्वाचा मानला गेला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणच्या हापूसची लोकप्रियता पश्चिमेकडील काही बागायतदारांना कदाचित सलत असावी, या हेतूनेच जगाच्या कोपऱ्यात आपलेही स्वतंत्र ब्रॅण्डिंग व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पश्चिम महाराष्ट्रात उसाचे पीक अधिक असते. आता तेथील शेतकरी कृषी विद्यापीठाच्या मदतीने आंब्याचे प्रयोग करु लागला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात विजय मेहता कुलगुरु असताना या भागातील नारळ व आंबा शिरोळच्या रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी कारखाना परिसरात कसा लावला होता, याचे वर्णन करत व पश्चिम महाराष्ट्रात कोकणकडे शेतीतील उत्पादन देणाऱ्या स्वतंत्र जातीबाबत कसा आपुलकीने पाहात असे, या गोष्टी सांगत असत. याच्यामध्ये स्पर्धा जरुर होती. मात्र, त्यामध्ये आपला भाग कोकणच्या पुढे जावा व या क्षेत्रात दबाव गट निर्माण करावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली नव्हती. दुर्दैवाने गेल्या आठवड्यात माध्यमांमधील बातम्या वाचल्यानंतर जुन्नर असो अथवा सातारा-सांगलीकडील गाव असो या भागात हापूसची आपली अशी स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. इतकेच नव्हे; तर मुंबईत खपला जाणारा आंबा अथवा विक्रीसाठी ठेवला जाणारा आंबा हा रत्नागिरी हापूस म्हणून विकला जातो. तो आता आपल्या भागाचा आंबा म्हणून समोर यावा, अशी काहींची इच्छा आहे. कोकणात रत्नागिरी, देवगड या दोन भागांनी कित्येक वर्षे हापूसचा स्वाद जगाला दिला आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी या मातीचा गुण आंब्यामध्ये चवीच्या रुपाने येतो आहे. तंत्र विकसित झाले असले तरी बाहेरुन येणारा पाहुणा हा रत्नागिरी हापूसची ओळख विसरु शकत नाही. आंब्यामधील रेषांचा अभ्यास हा अनेकवेळा त्याची ओळख स्पष्ट करतो. कोकणातील आंब्यावर निसर्गाची अवकृपा झाली तरी येथील शेतकरी आपला स्वाभिमान गहाण ठेवत नाही. किंबहुना एखाद्या वर्षी पिकाने दगा दिला असला तरी त्याचे दु:ख पचवत तो पुढील वर्षी नव्या दमाने उभा राहातो व शेती-बागायतीतील आपली ओळख स्वतंत्रच ठेवत असतो. हापूसमध्ये अनेक जाती विकसित करण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. कृषी तंत्रज्ञान या भागातील जमिनीचा कस व त्यावर पिकामध्ये येणारे गुण-दोष शोधून काढले आहेत. गेल्या १५ वर्षांत या भागात हापूसची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होत असली तरी दलालीचा शाप जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आव्हाने कायम राहतील. शेतकरी, बागायतदारांना आंबा शिकवतो, सुचवतो व जगायला प्रेरणा देतो.- धनंजय काळे--