शहरं
Join us  
Trending Stories
1
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
2
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
5
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
6
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
7
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
8
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
9
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
10
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
11
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
12
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
13
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
14
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
15
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
16
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
17
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
18
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
19
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
20
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार

कणकवली मुख्याधिकारी, नगररचना प्रमुखांविरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 5:23 PM

Kankavli, Muncipalty, builder, sindhudurgnews कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी विनोद डवले आणि नगररचना प्रमुख मयूर शिंदे हे दोघे बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून बेकायदा बांधकामांना अभय देत आहेत. कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी विनोद डवले आणि नगररचना प्रमुख मयूर शिंदे हे दोघे बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून बेकायदा बांधकामांना अभय देत आहेत.

ठळक मुद्देकणकवली मुख्याधिकारी, नगररचना प्रमुखांविरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार ! कन्हैया पारकर यांची माहिती

कणकवली : कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी विनोद डवले आणि नगररचना प्रमुख मयूर शिंदे हे दोघे बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून बेकायदा बांधकामांना अभय देत आहेत.

शासनाच्या विकास नियंत्रण नियमावलीचे राजरोस उल्लंघन केले जात आहे. त्याबद्दल या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक कन्हैया पारकर यांनी दिली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली हे जिल्ह्याचे मध्यवर्ती शहर आहे.या शहराची व्यापारी दृष्ट्या चांगलीच प्रगती झाली असून बांधकाम व्यवसाय सुद्धा बहरला आहे.मात्र, त्याचाच गैरफायदा मुख्याधिकारी विनोद डवले आणि नगर रचना प्रमुख मयूर शिंदे या दोघांकडून घेतला जात आहे. काही बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून बेकायदा बांधकामांना अभय दिले जात आहे. चुकीची भोगवटा प्रमाणपत्रे दिल्याने शासनाच्या विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन होत आहे.

अनेक बांधकामांना अशी भोगवटा प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तसेच कणकवली शहरामध्ये अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे याला जबाबदार हे अधिकारी आहेतयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार मी त्या माहितीतील एका बांधकामाची परवानगी, बांधकामाचा नकाशा तसेच भोगवटा प्रमाणपत्र यांची मागणी नगरसेवक या नात्याने केली होती. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

वास्तविक मी नगरसेवक आहे. या शहराचा विश्वस्त म्हणून मला माहिती देण्यास टाळाटाळ करणारे हे अधिकारी सामान्य माणसाला काय वागणूक देत असतील याची कल्पनाही करवत नाही.नकाशा, परवाना आणि भोगवटा प्रमाणपत्र देताना मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आम्हाला संशय आहे. अनेक नागरिकांनी तशा तक्रारी केल्या आहेत. हे दोन्ही अधिकारी आपल्या वर्तणुकीतून त्या संशयाला पुष्टी देत आहेत. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करावी . त्यामुळे शहरातील अनेक गैरप्रकार उघडकीस येतील अशी आम्हाला खात्री आहे. त्यासंबंधातील पुरावे आवश्यकता भासल्यास आम्ही सादर करु.मयूर शिंदे हे आपली इतरत्र बदली करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र , त्यांची बदली झाल्यास इतरत्रही असेच प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करावा आणि शहरे विद्रुप करणाऱ्या या अधिकाऱ्यांना कडक शासन करावे, अशी मागणीही आम्ही केली आहे. असेही कन्हैय्या पारकर यांनी या म्हटले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गLabourकामगार