शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

तेरा गावांतील मालमत्ता सर्वेक्षण पूर्ण

By admin | Published: August 31, 2015 9:30 PM

महामार्ग चौपदरीकरण : संपूर्ण मार्गाला सर्व्हिस रोड

कणकवली : महामार्ग चौपदरीकरणांतर्गत भूसंपादनामध्ये काही मालमत्ता जाणार आहे. जिल्ह्यातील २२ गावांपैकी आतापर्यंत तेरा गावांमधील अशा मालमत्तचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अद्याप झाडांच्या मोजणीचे काम बाकी आहे, अशी माहिती प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी दिली. महामार्ग चौपदरीकरणांतर्गत ग्रामीण भागात ६० मीटर आणि शहरांतर्गत ४५ मीटरचे भूसंपादन केले जाणार आहे. या चौपदरीकरणात होणाऱ्या भूसंपादनात काही मालमत्ता जाणार आहेत. त्याचे सर्वेक्षण केले जात आहे. चौपदरीकरणांतर्गत जिल्ह्यात महामार्गावरची २२ गावे येत असून त्यापैकी आतापर्यंत तेरा गावांमधील अशा मालमत्तेचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. अन्य गावांमधील सर्वेक्षण सुरू आहे. नडगिवे, तळेरे, आनंदनगर, उत्तर-दक्षिण गावठाण, जांभळगाव, नागसावंतवाडी, असलदे, नांदगाव, बेळणे खुर्द, हुंबरठ, कणकवली, वागदे आणि ओसरगांव या गावांतील मालमत्तेची मोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ८७ घरे, १५९ दुकानगाळे, ६० पडव्या, ३७ खोके, २२ विंधनविहिरी, २६ विहिरी, ६ सेप्टीक टॅँक, १३ पाण्याच्या टाक्या, ५३ शेड, २१ शौचालये, ६ गोठे, ११ स्टोअररूम आणि किरकोळ प्रकारची ७३८ एवढी मालमत्ता जात आहे. कणकवली शहरातील ३१ घरे, ९७ गाळे, ९ पडव्या, १६ खोके, ५ विंधनविहिरी, ४ विहिरी, २ टाक्या, ३६ शेड, १ शौचालय, २ स्टोअररूम, इतर १५ अशा मालमत्तेचा यात समावेश आहे. तर तळेरेतील १६ आणि आनंदनगरमधील १४ दुकानगाळ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)पूर्ण मार्गाला सर्व्हिस रोडमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात महामार्गाला सर्व्हिस रोड ठेवण्याची अट असते. त्याप्रमाणे सर्व मार्गाला समांतर सर्व्हिस रोड ठेवण्यात येणार आहे. जेथे ४५ मीटर रूंदीकरण होणार आहे. अशा ठिकाणीही सर्व्हिस रोड होणार आहे. अशी माहिती देण्यात आली.हरकती नोंदवल्या महामार्ग चौपदरीकरणाचा ढोबळ आराखडा तयार झाला आहे. गावातून महामार्गावर जोडणाऱ्या मार्गाच्या संदर्भात संबंधित ग्रामपंचायतींना हरकती नोंदवण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे हरकती नोंदवण्यात आल्या आहेत, असे प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी सांगितले.