मोरयाचा धोंड्याभोवती मंदिर बांधावे, काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 06:56 PM2020-10-26T18:56:15+5:302020-10-26T18:58:53+5:30

Ashok Chavan, congress, Sindhudurg port, sindhudurgnews छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याच्या वेळी दांडी येथील किनाऱ्यावर जेथे किल्ल्याचे भूमिपूजन केले त्या मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळाचे ऊन, वारा, पाऊस व समुद्री लाटांपासून संरक्षण होण्यासाठी या धोंड्याभोवती काळे दगड टाकून तो संरक्षित करावा.

Congress demands construction of temple around Morya rock: Attention of Construction Minister Ashok Chavan | मोरयाचा धोंड्याभोवती मंदिर बांधावे, काँग्रेसची मागणी

मालवण येथे मोरयाचा धोंड्याभोवती मंदिर बांधण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

Next
ठळक मुद्देमोरयाचा धोंड्याभोवती मंदिर बांधावे, काँग्रेसची मागणी बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे वेधले लक्ष

मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याच्या वेळी दांडी येथील किनाऱ्यावर जेथे किल्ल्याचे भूमिपूजन केले त्या मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळाचे ऊन, वारा, पाऊस व समुद्री लाटांपासून संरक्षण होण्यासाठी या धोंड्याभोवती काळे दगड टाकून तो संरक्षित करावा. तसेच त्याठिकाणी शिवलिंग स्वरुपात मंदिर बांधण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

साडेतीनशे वर्षांपूर्वी मालवणच्या समुद्रात किल्ले सिंधुदुर्गची उभारणी झाली. या किल्ल्याच्या बांधकामावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना आमंत्रित करून दांडी किनाऱ्यावरील खडकावर गणपती, शिवलिंग, सूर्य, चंद्र, पादुका, नंदी अशी चित्रे कोरून घेऊन त्याठिकाणी गणेश पूजन व भूमिपूजन करण्यात आले. तेव्हापासून या खडकाला मोरयाचा धोंडा असे संबोधले जाते. या धोंड्याच्या जागेची शासन दरबारी देखील नोंद करण्यात आली आहे.

सर्व्हे करून आराखडा तयार करण्यात यावा

हा धोंडा समुद्र किनाऱ्यावर असल्याने त्याचे ऊन, वारा, पाऊस आणि समुद्राच्या लाटांपासून संरक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी धोंड्याभोवती सात फूट खोल अंतरापर्यंत काळे दगड टाकून तो संरक्षित करावा. या दगडांच्या पायावर शिवलिंग स्वरुपात मंदिर बांधण्यात यावे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सर्व्हे करून आरखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी धुरी यांनी निवेदनात केली आहे.

 

Web Title: Congress demands construction of temple around Morya rock: Attention of Construction Minister Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.