शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

सिंधुदुर्ग बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व

By admin | Published: September 13, 2015 10:07 PM

सेना-भाजप युतीचा धुव्वा : एकही जागा हाती नाही; एक अपक्ष विजयी

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सेना- भाजपच्या उमेदवारांचा धुव्वा उडवित काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत एकाही संचालकाची जागा युतीच्या हाती लागली नाही. काँग्रेसच्या पूर्वीच दोन जागा बिनविरोध झाल्या असून, निवडणूक झालेल्या १७ संचालकांपैकी १६ संचालक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे, तर एक अपक्ष संचालक विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. के. चव्हाण यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रियेवेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, अशोक सावंत, प्रवीण भोसले, राष्ट्रवादीचे प्रसाद रेगे, अबीद नाईक, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, गुरुनाथ पेडणेकर, संजीवनी लुडबे व अन्य काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामपंचायत मतदारसंघातून काँग्रेसचे तुकाराम साईल व संतोष राणे हे दोन उमेदवार मताधिक्क्याने विजयी झाले. तुकाराम साईल यांना १८७९ व संतोष राणे यांना १९२९ मते मिळाली, तर पराभूत झालेले शिवसेना-भाजप युतीचे गजानन प्रभू यांना ४२१, तर रघुनाथ रेडकर यांना ३८५ मते मिळाली. सहकार संस्था मतदारसंघामधून काँग्रेसचे कृष्णा करलकर, जॉकी डिसोजा, राजन परब, प्रकाश राणे, अरविंद रावराणे, तुळशीदास रावराणे, अवधूत रेगे हे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सात उमेदवार विजयी होत सेना-भाजप विरोधी गटाच्या उमेदवारांचा पराभव केला. कृष्णा करलकर यांना १५४९, जॉकी डिसोजा १५३३, राजन परब १५३७, प्रकाश राणे १५७०, अवधूत रेगे १५४३ अशी विजयी मते मिळाली तर सेना-भाजपच्या दीपक कदम यांना ३०७, सुधीर गवस ३०७, दिगंबर तावडे ३१४, प्रकाश पार्सेकर २९५, प्रमोद राऊळ ३०६, रमाकांत सावंत ३३५ तर अपक्ष रमाकांत वायंगणकर २९, रवींद्र कसालकर १५ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.महिला मतदारसंघातून देसाई, बुडकुले विजयी --सर्वसाधारण सहकार महिला राखीव मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सुजाता देसाई व कल्पना बुडकुले या विजयी झाल्या. सुजाता देसाई यांना १५९३, तर कल्पना बुडकुले यांना १४७३ एवढी विक्रमी मते मिळाली, तर सेना-भाजप युतीच्या स्नेहा दळवी यांना ३६० व अनिषा परब यांना ३३७ मते मिळाली. सहकारी संस्था इतर मागास मतदारसंघातून काँग्रेसच्या स्नेहल पाताडे विजयी झाल्या. त्यांना १६२२ मते मिळाली, तर सेना-भाजपच्या धनंजय टेमकर यांना ६६, राजेंद्र सुतार यांना ३२६ मते पडल्याने त्यांचा पराभव झाला. प्रक्रिया व पणन या मतदारसंघातून काँग्रेसचे मनीष दळवी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी अनंत फोंडके यांना २७ मते पडल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. हमाल तोलारी मतदारसंघात मात्र काँग्रेसचे सुशांत राऊळ यांना ४ मते मिळून पराभव पत्करावा लागला, तर अपक्ष समीर परब यांना २१ मते पडून ते विजयी झाले आहेत. विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून काँग्रेसचे गंगाराम वरक हे १४८४ मतांनी विजयी झाले, तर शिवसेनेच्या शामसुंदर गवळी यांना ५४६ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.